Jio New Recharge Plan : देशातील आघाडीचा टेलिकॉम ब्रँड Reliance Jio ने पुन्हा एकदा स्पर्धक कंपन्यांची झोप उडवली आहे. कारण त्यांनी एक नवा, दमदार आणि ग्राहकाभिमुख रिचार्ज प्लॅन आणला आहे. तब्बल ९० दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, SMS आणि OTT सबस्क्रिप्शन यांचा जबरदस्त समावेश आहे. आणि हे सगळं फक्त ८९९ रुपयांमध्ये.
90 दिवसांची वैधता: तीन महिने
अनलिमिटेड कॉलिंग: देशभरात कोणत्याही नेटवर्कवर
रोज 100 SMS: सर्व नेटवर्कसाठी
एकूण 200GB डेटा: 180GB बेस + 20GB बोनस डेटा म्हणजे दररोज सुमारे 2GB पेक्षा जास्त
OTT सबस्क्रिप्शन: 90 दिवसांची Jio Hotstar सदस्यता, IPL 2025 ची लाईव्ह मॅचेस, वेब सिरीज आणि चित्रपटांसाठी
इतर फायदे: JioTV वर मोफत लाइव्ह टीव्ही चॅनेल्स आणि JioCloud मध्ये 50GB फ्री स्टोरेज
हा प्लान खास करून OTT कंटेंट पाहणारे, मोबाईल ब्राउजिंग, वर्क फ्रॉम होम करणारे आणि हाय डेटा युजर्स यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो आहे. कमी किंमत, मोठा डेटा पॅक आणि ३ महिन्यांची वैधता हे याचे खास वैशिष्ट्य आहे.
जिओच्या या नव्या प्लानमुळे टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. विशेषतः Airtel, Vi आणि BSNL सारख्या कंपन्यांसमोर ग्राहकांना आकर्षित करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. जिओच्या विविध श्रेणीतील (Popular Plans, 5G Unlimited, Entertainment Plans, JioPhone Plans) रिचार्ज प्लॅन मुळे ग्राहकांना निवड करताना अधिक पर्याय मिळत आहेत.
तुम्ही जर जास्त दिवसांच्या फायदेशीर आणि मनोरंजनाने भरलेला रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर Jio चा ८९९ रुपयांचा हा नवा प्लॅन नक्कीच 'पैसा वसूल' ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.