jio plan with disney hotstar benefit  sakal
विज्ञान-तंत्र

जिओचा सर्वात स्वस्त Disney+ Hotstar देणारा प्लॅन, डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे

सकाळ डिजिटल टीम

jio plan with disney hotstar benefit : मागच्या वर्षात दरवाढ केल्यानंतर टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्लॅन देणे सुरु केले आहेत, तरेच अनेक प्लॅन्स काढून देखील टाकण्यात आले आहेत. दरम्यान युजर्सची गरज लक्षात घेत जिओने एक प्लॅन परत सुरु केला आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, जिओने 499 रुपयांचा प्लॅन पुन्हा ऑफर करण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनसह देण्यात येतो. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व बेनिफिट्सबद्दल जाणून घेऊया.

जिओने आता 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन पुन्हा सादर केला आहे जो मागील महिन्यात दरवाढीनंतर प्रीपेड टॅरिफ यादीमधून काढून टाकला होता. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळतो. हे अनलिमीटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील देण्यात येतात. दैनंदिन 2GB डेटा संपल्यानंतर, डाटा स्पीड कमी करून 64 Kbps केली जाते.

याशीवाय वापरकर्त्यांना या प्लॅनसह जिओ प्राइमची मेंबरशिप देखील मिळते. तसेच फ्रीमध्ये Disney+ Hotstar चे एक वर्षासाठी सब्सस्क्रिप्शन देण्यात येते. या सोबतच Jio Cinema, JIo TV सारख्या Jio अॅप्सचा एक्सेस देखील मिळतो.

Jio च्या या प्लॅनमध्ये मिळतं Disney + Hotstar सब्सक्रिप्शन

601 रुपयांचा प्लॅन - Jio चा 601 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये OTT अॅक्सेस देखील देण्यात येतो. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिन 3GB डेटा दिला जातो. दररोज 3GB डेटासोबत, प्लॅनमध्ये अतिरिक्त 6GB डेटा देखील मिळतो. जिओचा 601 रुपयांचा प्लॅन एका वर्षाच्या Disney+ Hotstar मोबाइल अॅक्सेससह येतो, ज्याची किंमत 499 रुपये आहे.

799 रुपयांचा प्लॅन - Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येणारा हा दुसरा प्लॅन प्लॅन आहे. दरवाढीपूर्वी हा प्लॅन 666 रुपयांचा होता, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग 56 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 100 SMS सह देण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT