Jio 5G Sakal
विज्ञान-तंत्र

Jio 5G: जिओचे नववर्षाचे गिफ्ट! महाराष्ट्रातील 'या' शहरांसह ११ ठिकाणी ५जी सेवा सुरू; मोफत मिळेल हाय-स्पीड इंटरनेट

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच ५जी सेवा लाँच केली आहे. कंपनी हळूहळू देशातील इतर शहरांमध्ये सेवा सुरू करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jio True 5G Network: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच ५जी सेवा लाँच केली आहे. कंपनी हळूहळू देशातील इतर शहरांमध्ये सेवा सुरू करत आहे. आता कंपनीने सर्वात मोठे ५जी रोलआउट केले आहे. जिओने एकाचवेळी ११ शहरांमध्ये ५जी सेवा लाँच करत यूजर्सला नववर्षाचे गिफ्ट दिले आहे. ११ शहरांमधील यूजर्स Jio Welcome offer चा फायदा घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत जिओ यूजर्सला मोफत १ जीबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा फायदा मिळेल.

या ११ शहरांमध्ये सुरू झाली जिओची ५जी सेवा

जिओने महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबादसह लखनौ, तिरुवंतपुरम, म्हैसुर, चंदीगड, मोहाली, पंचकुला आणि जीरकपुर या शहरांमध्ये ५जी सेवा रोलआउट केली आहे.

जिओ या शहरांमध्ये ५जी सेवा सुरू करणारी पहिली आणि एकमेव कंपनी आहे. या शहरातील जिओ यूजर्स Jio Welcome offer चा फायदा घेऊ शकतात.

५जी सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे ५जी फोन असणे गरजेचे आहे. तुम्हाला यासाठी नवीन सिम कार्ड घेण्याची गरज नाही. केवळ तुमच्या भागामध्ये ५जी सेवा उपलब्ध असणे गरजेचे आहे. Jio 5G Welcome Offer अंतर्गत तुम्हाला अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा मिळेल. तुम्हाला १ जीबीपीएस इंटरनेट स्पीड मिळेल. याद्वारे तुम्ही अवघ्या २ ते ४ सेकंदात २ जीबीचा चित्रपट डाउनलोड करू शकता.

Jio 5G Welcome Offer चा घ्या फायदा

Jio वेलकम ऑफर कंपनीच्या MyJio App या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. कंपनीने ५जी नेटवर्क उपलब्ध असलेल्या शहरातील यूजर्सला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी इनव्हाइट केले आहे.

हेही वाचा: Maharashtra Karnataka Border : या पहिलवानाने स्वीकारलेलं बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिलं हौताम्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT