reliance jiofiber launched new plans at zero entry cost for postpaid users know details
reliance jiofiber launched new plans at zero entry cost for postpaid users know details  
विज्ञान-तंत्र

जिओचे नवीन JioFiber प्लॅन; प्रवेश शुल्क झिरो, मिळतील अनेक फायदे

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही घरबसल्या नवीन ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Reliance JioFiber ने वापरकर्त्यांसाठी एक बेस्ट ऑफरची घोषणा केली आहे. या अंतर्गत, कंपनी आपल्या पोस्टपेड प्लॅनद्वारे वापरकर्त्यांना अमर्यादित मनोरंजनाचा लाभ देणार आहे. हे प्लॅन 399 ते 3,999 रुपयांच्या दरम्यान आहेत. यापैकी काही प्लॅनमध्ये कंपनी Amazon Prime सोबत Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

या लॉन्च केलेल्या प्लॅनमध्ये, तुम्हाला दरमहा 100 रुपये आणि 200 रुपये अतिरिक्त देऊन 14 ओटीटी अॅप्सचा एक्सेस मिळवू शकता. 22 एप्रिल रोजी लाईव्ह होणार्‍या या प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेटची स्पीड 1000Mbps पर्यंत आहे.

399 आणि 699 रुपयांचे प्लॅन

कंपनीचे हे पहिले बेसिक इंटरनेट प्लॅन होते. आता कंपनी वापरकर्त्यांना 200 रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे देऊन त्यामध्ये करमणूकीची सोय देखील देत आहे. आता हे प्लॅन वेगवेगळ्या पर्यायांसह येतात. प्लॅनमध्ये यूजर्सना इंटरनेट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट प्लसचा पर्याय मिळतो. 399 रुपयांच्या बेसिक प्लॅनमध्ये तुम्हाला 30Mbps च्या स्पीडने अमर्यादित हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्ही दरमहा 100 रुपये अधिक जोडल्यास तुमचा प्लॅन एंटरटेनमेंटसाठी अपग्रेड करु शकता आणि तुम्हाला त्यात 6 OTT अॅप्स पाहायला मिळतील.

त्याचप्रमाणे, 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 रुपये प्रति महिना जोडल्यास, तुम्हाला Entertainment Plus चा लाभ मिळेल, ज्यामध्ये कंपनी 14 अॅप्स ऑफर करत आहे. हाच प्लॅन 699 रुपयांच्या प्लॅनसाठी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळणारा इंटरनेट स्पीड 100Mbps असेल.

Amazon Prime आणि Netflix

999 ते 3999 रुपयापर्यंतचे सर्व प्लॅन एंटरटेनमेंट प्लस सेगमेंटमध्ये आहेत, जे पूर्वी देखील येत असत. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 150Mbps स्पीड आणि Amazon Prime मिळेल. त्याच वेळी, 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी 300Mbps च्या स्पीडसह Amazon Prime आणि Netflix Basic ऑफर करत आहे.

जर तुम्ही कंपनीच्या 2499 रुपयांच्या प्लॅनबद्दल विचार करत असाल तर तुम्हाला Amazon Prime आणि Netflix Standard 500Mbps च्या वापरता येतील. 3999 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी Amazon Prime आणि Netflix चे प्रीमियम सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 1000Mbps आहे.

Disney+ Hotstar, Zee5, Discovery Plus, Eros Now, Sony Liv आणि Lionsgate हे मोफत इंटरनेट बॉक्स आणि सेट-टॉप बॉक्स प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या 14 मोफत OTT Apps पैकी आहेत . कंपनीच्या नवीन प्लॅन्सची खास गोष्ट म्हणजे नवीन वापरकर्त्यांना जिओ फायबर पोस्टपेड कनेक्शन निवडण्यासाठी झिरो कॉस्ट इंटरनेट बॉक्स, सेट-टॉप बॉक्स आणि इन्स्टॉलेशन मोफत मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT