renault kwid launched in india check price mileage and all details here  
विज्ञान-तंत्र

स्वस्तात मस्त Renault Kwid भारतात लाँच; फक्त 'इतकी' असेल किंमत

सकाळ डिजिटल टीम

मारुती अल्टोला टक्कर देण्यासाठी आज आणखी एक स्वस्त कार भारतात लाँच करण्यात आली आहे. Renault India ने आज नवीन 2022 Kwid लाँच केली आहे या कारची किंमत 4.49 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, त्यामुळे तुम्हाला अल्टोसाठी एक नवा पर्याय मिळणार आहे. यापूर्वी, 2015 मध्ये लॉन्च केलेली Renault Kwid ही कार आतापर्यंत 4 लाख ग्राहकांनी खरेदी केली आहे. यामुळे या फ्रेंच कार कंपनीची ही भारतातील सर्वात यशस्वी कार बनली आहे.

Kwid मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह 0.8-लिटर आणि 1-लिटर पेट्रोल पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, मायलेजच्या बाबतीत, Kwid ही ARA टेस्टिंग सर्टिफिकेशननुसार 22.25 kmpl चे मायलेज देते.

KWID नवीन ड्युअल-टोन फ्लेक्स व्हीलसह अनेक कलर पर्यायांमध्ये येते. यात अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, ऑडिओ प्लेबॅक आणि व्हॉइस रेकग्निशनसह फर्स्ट-इन-क्लास 8-इंच टचस्क्रीन MediaNAV इव्होल्यूशन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.

याशिवाय रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस आणि ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, ओव्हरस्पीड अलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि प्री-टेन्शनर यांसारखी वैशिष्ट्येही यात आहेत. नवीन Renault Kwid ही मारुती सुझुकी अल्टो आणि Datsun Go शी स्पर्धा करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : अमरावतीत काँग्रेसची आढावा बैठक; तीनही नगरपरिषद जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय

SCROLL FOR NEXT