ISS Crew Faces Superbug Scare: Health Risks for Sunita Williams and Colleagues esakal
विज्ञान-तंत्र

Sunita Williams Superbug : अवकाशात सुनीता विल्यम्सचं टेन्शन वाढवणार 'सुक्ष्म राक्षस'; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

IIS Superbug Threat : 'सुपरबग'मुळे अंतराळवीरांसाठी श्वास घेणं होऊ शकत मुश्किल

Saisimran Ghashi

Boeing's Starliner : सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर Butch विल्मोर हे जून 6, 2024 रोजी नवीन Boeing Starliner अंतराळयानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचले आहेत. ते पृथ्वीवर परत येण्यापूर्वी अंतराळ स्थानकावर एक आठवडा राहणार आहेत.

पण आता सुनीता विल्यम्स आणि इतर आठ सदस्यांच्या टीमसमोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. या स्थानकावर आढळलेला 'सुपरबग' त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

अंतराळात घेराव असलेल्या या परिसरात 'Enterobacter bugandensis' नावाचा हा अति- औषधप्रतिरोधी जंतु (सुपरबग) आढळला आहे. हा जंतु श्वसनसंस्थेवर परिणाम करतो.

अंतराळ स्थानकावर नेहमी अंतराळ कचरा आणि उल्कापिंडांची धास्ती असतेच, पण आता या सह प्रवासातून आलेले आणि गेल्या 24 वर्षात विकसित झालेले हे जंतु आणखी मोठी चिंता बनली आहे.

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या डॉ. कस्तूरी रंगास्वामी यांनी या सुपरबगवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की पृथ्वीवरील जंतुंपेक्षा अंतराळात आढळलेले हे जंतु वेगळे असून त्यांच्यात उत्परिवर्तन झाले आहे. ते अधिक तग धरून राहण्याची क्षमता विकसित करून घेत आहेत.

या संशोधनात सहभागी असलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थान (IIT) मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रामा म्हणाले, "अतिशय कठीण परिस्थितींमध्येही वाढणारे जंतु आपल्यासमोर कोडे उभे करत आहेत."

जागतिक शास्त्रीय नियतकालिक 'मायक्रोबायोम'मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार अंतराळवीरांच्या आरोग्यावर होणारा या सूक्ष्मजीवांचा प्रभाव तपासण्यासाठी अंतराळ स्थानकावरील सूक्ष्मजीवीय वातावरणाचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे निष्कर्ष संशोधकांनी काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : जम्मू-पठाणकोट महामार्गाजवळील सहर खड नदीवरील खचला

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT