AC tips for Summer eSakal
विज्ञान-तंत्र

AC tips for Summer : उन्हाळ्यात एसीचं तापमान किती ठेवावं? लाईट बिल वाचवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Electricity Bill Saving : एसीच्या तापमानात एक डिग्रीचा फरक झाला तर वीजेच्या वापरावर 6 टक्के परिणाम होतो.

Sudesh

AC Temperature for Energy Saving : यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. यामुळे कित्येकांनी एसी वापरण्यास सुरुवात केली आहे. एसीच्या किंमती कमी झाल्यामुळे घरा-घरांमध्ये एसी दिसू लागला आहे. मात्र, अजूनही कित्येक लोक एसीमुळे जास्त लाईट बिल येतं म्हणून एसीचा वापर टाळतात.

एसीचं तापमान योग्य प्रकारे मॅनेज केल्यास तुम्ही लाईट बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत करू शकता. कित्येक वर्षांपासून एसी वापरत असणाऱ्या लोकांनाही याबाबत माहिती नसते. कितीतरी लोक एसी 18 किंवा 21 डिग्री सेल्सिअसवर ठेवतात, आणि रुम थंड झाली की तो बंद करतात. मात्र, यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने एसी वापरल्यास तुम्ही भरपूर बचत करू शकता.

किती तापमानावर चालवावा एसी?

तुम्ही पाहिलं असेल, की जवळपास सगळ्या एसींचं डीफॉल्ट टेम्परेचर हे 24 डिग्री सेल्सिअस असतं. 2020 सालापासून सरकारनेच याबाबत निर्देश दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते हेच तापमान एसी वापरण्यासाठी सर्वात योग्य आहे. एसीचं तापमान तुम्ही किती ठेवत आहात त्यानुसार एसीवरील लोड बदलतो. याचाच परिणाम आपल्या बिलावर होतो.

तापमान आणि विजेचा वापर

एसीच्या तापमानात एक डिग्रीचा फरक झाला तर वीजेच्या वापरावर 6 टक्के परिणाम होतो. 24 डिग्री तापमानावरुन 23 डिग्री सेल्सिअस तापमान केलं, तरी वीजेचा 6 टक्के अधिक वापर होतो. कारण तापमान कमी करण्यासाठी एसीचा कंप्रेसर अधिक काम करतो. म्हणजेच, जास्त तापमानावर एसी वापरुन तुम्ही वीजेची बचत करू शकता.

आपल्यासाठी 24 डिग्री पुरेसं

मानवी शरीराचं तापमान हे साधारणपणे 36 ते 37 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. त्यामुळे 24 डिग्री सेल्सिअस तापमान हे आपल्याला थंड ठेवण्यासाठी पुरेसं आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. डॉक्टरांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT