RO Technology esakal
विज्ञान-तंत्र

RO मध्ये पाणी कसं स्वच्छ होतं? UV लाइट खराब झाला तर? वाचा महत्वाची माहिती

RO मध्ये कशा प्रकारे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ बनवल्या जाते माहितीये? आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

साक्षी राऊत

RO Technology : बऱ्याच घरात पाणी स्वच्छ करण्यासाठी RO चा वापर केला जातो. अनेक घरात खारे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी RO चा वापर केला जातो. मात्र RO मध्ये कशा प्रकारे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ बनवल्या जाते माहितीये? आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

RO मधील पाणी स्वच्छ करण्यासाठी अनेक फिल्टर, मेम्ब्रेन आणि यूव्ही लाइटचा वापर केला जातो. या तिघांमधून गेल्यावर पाणी स्वच्छ होते. या तिन्ही ठिकाणी पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्याला कोणत्या प्रक्रियेतून जावे लागते जाणून घ्या.

RO मध्ये फिल्टरचा वापर

RO मध्ये सहसा तीन फिल्टर दिले जातात. या फिल्टरच्या मदतीने धूळ पाण्यापासून वेगळी केली जाते. तुम्ही अनेकदा आरओच्या बाहेर पाहिले असेल जिथे पाण्याचे कनेक्शन आहे तिथे सिलेंडरसारखा भाग असतो. त्याच्या आत पहिला फिल्टर आहे, जो तीन महिन्यांनंतर बदलला पाहिजे. यानंतर पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी दोन फिल्टर दिले जातात.

मेम्ब्रेनचा वापर

RO मध्ये सामान्य फिल्टर व्यतिरिक्त, एक मेम्ब्रेनसुद्धा असते. त्यात अतिशय बारीक फिल्टर्स असतात, जे खाऱ्या पाण्यापासून मीठ वेगळे करतात आणि पाणी गोड करतात. RO मध्ये मेम्ब्रेनचा वापर सुमारे एक वर्ष करता येतो. RO ची मेम्ब्रेन खराब झाल्यास पाण्याची चव बदलू लागते.

यूव्ही लाइट टेक्नीकचा वापर

आपण ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत त्याला यूव्ही लाईट टेक्नॉलॉजी म्हणतात किंवा आपण त्याला अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञान देखील म्हणू शकता. ही प्रक्रिया वॉटर प्युरिफायरच्या शेवटच्या टप्प्यात होते, ज्यामध्ये पाण्यात असलेले जंतू नष्ट होतात आणि तुमचे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ होते. आणि त्याचा तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

या तंत्राचा वापर करण्यासाठी, एक विशेष चेंबर बनविला जातो ज्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट लाइटिंग असते. तुम्ही ऐकलेच असेल की अल्ट्राव्हायोलेट किरण तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो आणि त्याचा त्वचेवरही खूप वाईट परिणाम होतो, त्याचप्रमाणे हा प्रकाश पाण्यातील बॅक्टेरिया देखील नष्ट करतो आणि हा प्रकाश चालू होताच जीवाणू पूर्णपणे नष्ट होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Case : बोगस फेसबुक आयडीद्वारे भाजप नेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल केलं; नऊ व्हिडिओ, धक्कादायक माहिती समोर

Shirwal Accident भरधाव कार डिव्हायडर तोडून ३-४ वेळा उलटली अन् ट्रकला धडकली; १९-२० वर्षांच्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू

Pune Corruption: मद्यविक्री परवान्यासाठी २२ लाखांची लाच मागितली; पुण्यात स्टेट एक्साईज निरीक्षकाला एसीबीने ठोकल्या बेड्या

पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, तळेगाव दाभाडेच्या ४ तरुणांचा मृत्यू; दोघे गंभीर

Gokul Milk Union Election 2026 : राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; 60 दिवसांत 'गोकुळ'ची निवडणूक घेण्याचे आदेश, 15 ऑक्टोबरपूर्वी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT