Robot Falls Down eSakal
विज्ञान-तंत्र

Robot collapses Video : माणसांची जागा घेईल का एआय? काम करता करता जागीच कोसळला रोबोट; व्हिडिओ व्हायरल

Robot Viral Video : रोबोट माणसांप्रमाणे थकत नाही किंवा ब्रेक घेत नाही, यामुळेच कित्येक कारखाने माणसांऐवजी रोबोट्सचा वापर करण्याचा विचार करत आहेत. मात्र या व्हिडिओमुळे मानवच रोबोटपेक्षा कार्यक्षम असल्याचं दिसून येत आहे.

Sudesh

Agility Robotics Viral Video : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे कित्येकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत असं म्हटलं जातं. भविष्यात हे होणार असल्याचं भाकित कित्येक तज्ज्ञांनी केलं आहे. मात्र याला अद्याप खूप वेळ असल्याचंही लोक म्हणतात. याचाच पुरावा म्हणून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हिडिओमध्ये एक रोबोट फॅक्टरीमधील काम करताना दिसत आहे. सुमारे 20 तास काम केल्यानंतर हा रोबोट चक्क खाली कोसळतो. यामुळे कित्येक नेटिझन्स रोबोटच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

रोबोट हे माणसांपेक्षा अधिक चांगलं, अधिक वेगाने आणि अधिक प्रमाणात काम करू शकतात हे कायमच म्हटलं जातं. रोबोट माणसांप्रमाणे थकत नाही किंवा ब्रेक घेत नाही, यामुळेच कित्येक कारखाने माणसांऐवजी रोबोट्सचा वापर करण्याचा विचार करत आहेत. मात्र या व्हिडिओमुळे मानवच रोबोटपेक्षा कार्यक्षम असल्याचं दिसून येत आहे.

कंपनीचा दावा

हा रोबोट बनवणाऱ्या Agility Robotics कंपनीने म्हटलं आहे, की हा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट ह्युमनॉईड रोबोट आहे. Digit नाव असणाऱ्या या रोबोटचा हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे. मात्र काही कारणामुळे हा व्हिडिओ यावर्षी पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा रोबोट अधिक वेगवान आणि लवचिक आहे. तसंच, छोट्या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी हा अगदी योग्य असल्याचं मत कंपनीने व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT