Royal Enfield Classic Bullet Sakal
विज्ञान-तंत्र

Royal Enfield Launch 2023: बुलेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! रॉयल इनफिल्डचा नवा व्हेरिएंट लाँच; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...

जाणून घ्या या मोटरसायकलमध्ये काय खास आहे आणि ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील.

वैष्णवी कारंजकर

New Royal Infield Bike Launch : बुलेटबाबत नेहमीच प्रचंड क्रेझ राहिली आहे. आत्तापर्यंत या बाईकचे अनेक व्हेरिएंट आले आहेत आणि ती अनेक वेळा अपडेट करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा Royal Enfield ने नवीन Bullet लॉन्च केली आहे. जाणून घ्या या मोटरसायकलमध्ये काय खास आहे आणि ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील.

रॉयल एनफिल्डने नवीन बुलेट ३५० लॉन्च केली आहे. या बाईकचे तीन व्हेरिएंट आहेत. पहिला मिलिटरी व्हेरिएंट आहे, जो लाल आणि काळ्या रंगात येतो. दुसरा स्टँडर्ड व्हेरिएंट आहे, जो काळा-मरून रंगात येतो. तिसरा ब्लॅक-गोल्ड कलर व्हेरिएंट आहे. या बाईकच्या डिझाइनबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन रॉयल एनफील्ड बुलेटमध्ये एक आकर्षक हँडलबार आणि डिजिटल अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. रॉयल एनफील्डचा नवीन व्हेरिएंट, त्याचं इंजिन आणि किमतीसह जाणून घ्या सर्वकाही.

रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० चे व्हेरिएंट

बुलेटचे मिलिटरी व्हेरियंट हे एंट्री लेव्हल मॉडेल आहे, ते ग्राफिक्स आणि चांगल्या रंगाच्या ऑप्शन्ससह उपलब्ध आहेत. याला सिंगल चॅनल ABS आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतात.

नवीन बुलेटच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये क्रोम फिनिश इंजिन आणि मिरर, सोनेरी रंगाचा 3D बॅज, मागील बाजूस डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल एबीएस सिस्टम आहे.

बुलेट ३५० च्या टॉप मॉडेलमध्ये काळा आणि गोल्डन रंग, सोनेरी रंगात 3D लोगो, मागील बाजूस डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे.

रॉयल एनफील्ड बुलेट 350 इंजिन

रॉयल एनफील्ड बुलेटमध्ये 349 सीसी जे सीरीज एअर कूल्ड इंजिन आहे. हे 20.2 bhp पॉवर आणि 27Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. हेच इंजिन सेटअप मीटीऑर ३५० आणि हंटरमध्येही आढळतं. स्पीड नियंत्रित करण्यासाठी बुलेटला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

रॉयल एनफील्ड बुलेट 350 सुरक्षा आणि सस्पेन्शन

नवीन बुलेटमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन गॅस चार्ज्ड रिअर शॉक आहेत. याशिवाय बाइकला १००-सेक्शन फ्रंट टायर आणि १२०-सेक्शन रियर टायर देण्यात आले आहेत.

रॉयल एनफील्ड बुलेट ३५०ची किंमत

नवीन रॉयल एनफील्ड बुलेटची सुरुवातीची किंमत १.७४ लाख रुपये (मिलिटरी व्हेरिएंट) आहे. त्याच्या मिड-लेव्हल व्हेरिएंटची (स्टँडर्ड) किंमत १.९७ लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची (ब्लॅक-गोल्ड) किंमत २.१६ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम प्राईझ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

SCROLL FOR NEXT