Royal Enfield Classic 350  google
विज्ञान-तंत्र

रॉयल इनफिल्डने २६ हजार ३०० गाड्या मागवल्या परत; दोष असल्यानं निर्णय

सकाळ डिजिटल टीम

रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) सर्वात लोकप्रिय बाइक क्लासिक 350 (Classic 350) मध्ये तांत्रिक अडचण आढळल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून कंपनीने या बाइकचे तब्बल 26,300 युनिट्स परत मागवले आहेत. 1 सप्टेंबर 2021 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान बनवलेल्या J1A मोटरसायकलमध्ये ही समस्या आढळून आली आहे. (Royal Enfield Classic 350 brake Issue)

सोसायटी ऑफ इंडियन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Indian Automobile Manufacturer's Association) किंवा SIAM आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport and Highways) अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या समस्येबाबत रॉयल एनफिल्डने सांगितले की, त्यांच्या तांत्रिक टीमला बाईकच्या स्विंग आर्मला जोडलेले ब्रेक रिअॅक्शन ब्रॅकेट या पार्टमध्ये समस्या आढळून आली. हा पार्ट 2021 सिंगल-चॅनल ABS आणि क्लासिक 350 मोटरसायकलच्या मागील ड्रम ब्रेकमध्ये वापरला जातो.

कंपनीला बाइकच्या स्पेसिफीक रायडिंग कंडीशनमध्ये मागील ब्रेक पेडलवर देण्यात आलेल्या जास्तीच्या ब्रेकिंग लोडमुळे रिअॅक्शन ब्रॅकेटला नुकसान होऊ शकते असे आढळून, ज्यामुळे ब्रेकिंगचा मोठा आवाज आणि त्यानंतरच्या ब्रेकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. कंपनीने म्हटले आहे की, 1 सप्टेंबर 2021 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान तयार कलेल्या सिंगल-चॅनल ABS, रियर ड्रम ब्रेक क्लासिक 350 मॉडेल्समध्ये येत असलेली ही अडचण सोडवण्यात येत आहे.

ग्राहकांसाठी महत्वाचे..

रॉयल एनफिल्ड सर्व्हिस टीम किंवा स्थानिक डीलरशिप ज्या ग्राहकांचा मोटरसायकल वाहन ओळख क्रमांक (VIN) क्रमांक या उत्पादन तारखेदरम्यान आहे त्यांच्याशी संपर्क करेल. रॉयल एनफील्डचे ग्राहक स्थानिक रॉयल एनफिल्ड वर्कशॉप कंपनीच्या वेबसाइट वर देखील शोधू शकतात, किंवा 1800210007 वर कॉल करू शकतात. रॉयल एनफिल्डने सांगितले की, आम्ही प्रोटोकॉल, क्वालिटी आणि ग्लोबल वॅलिडेशन स्टॅंडर्डचे पालन करतो. ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आणि आमच्या ग्राहकांची कमीत कमी गैरसोय होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे देखील सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT