Laptop Sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : ‘एस्पायर ७’चा तंत्रविस्तार

गेमिंग लॅपटॉपसाठी चर्चेत असलेल्या एसरकडून सातत्याने नवनव्या अपडेट्स बाजारात आणल्या जातात. त्यानुसार नुकतेच एस्पायर ७ या गेमिंग लॅपटॉपची नवी श्रेणी बाजारात आणली आहे.

ऋषिराज तायडे

गेमिंग लॅपटॉपसाठी चर्चेत असलेल्या एसरकडून सातत्याने नवनव्या अपडेट्स बाजारात आणल्या जातात. त्यानुसार नुकतेच एस्पायर ७ या गेमिंग लॅपटॉपची नवी श्रेणी बाजारात आणली आहे.

गेमिंग लॅपटॉपसाठी चर्चेत असलेल्या एसरकडून सातत्याने नवनव्या अपडेट्स बाजारात आणल्या जातात. त्यानुसार नुकतेच एस्पायर ७ या गेमिंग लॅपटॉपची नवी श्रेणी बाजारात आणली आहे. अत्याधुनिक 12th Gen Intel® Core™ i5 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce GTX™ 1650 ग्राफिक्सने सुसज्ज असलेल्या या नव्या लॅपटॉपमुळे गेमिंगचा आगळावेगळा अनुभव गेमर्सला मिळणार आहे. त्याशिवाय एक्स्ट्रा थर्मल व्हेंटिलेशन, आकर्षक डिझाईन आणि उत्तम साऊंड ही या लॅपटॉपची आणखी वैशिष्ट्यं म्हणता येतील.

डिस्प्ले व डिझाइन

एस्पायर ७ या लॅपटॉप १५.६ इंच एफएचडी आयपीएस डिस्प्लेसह लॉन्च झाला असून, स्क्रीन टू बॉडी रेशो जवळपास ८१.६७ टक्के इतका आहे. तसंच एसर ब्ल्यूलाइटशिल्ड आणि एसर एक्साकलर तंत्रज्ञानामुळे आकर्षक स्क्रीनचा अनुभव मिळतो. १९.९ मिलिमीटर अॅल्युमिनिअम चेसिस, इलिव्हेटिंग हिंजेस, बॅकलाइट कीबोर्ड आणि चारकोल ब्लॅक रंगामुळे या लॅपटॉपला आकर्षक लूक मिळाला आहे.

उत्तम परफॉर्मसन्स

केवळ अत्याधुनिक 12th Gen Intel® Core™ i5 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce GTX™ 1650 ग्राफिक्सच नव्हे, तर तब्बल ३२ जीबीपर्यंत विस्तार करता येणारी रॅम आणि २ टीबीपर्यंतचा ड्युएल एसएसडी स्टोरेजमुळे हा लॅपटॉप परफॉर्मन्स आणि स्टोरेजच्या बाबतीत आऊट ऑफ द बॉक्स ठरतो.

थर्मल सोल्युशन्स

कोणताही गेमिंग लॅपटॉप म्हटलं, तर ओव्हरहिटिंगचा प्रश्न उद्‍भवतोच. त्यावर उपाय म्हणून कूलिंग पॅड, एक्झॉस्ट फॅन आदी लॅपटॉपमध्ये देण्यात येतात. एस्पायर ७ या लॅपटॉपमध्ये ड्युएल फॅनसोबतच इनलेट कीबोर्डचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे इतर लॅपटॉपच्या तुलनेत जवळपास १० टक्के उष्णता बाहेर फेकली जाते. त्याशिवाय ट्रिपल थर्मल पाईप लॅपटॉपला ओव्हरहिट होण्यापासून रोखतो.

स्मार्ट कनेक्टिव्हिटी

एस्पायर ७ या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय 6 आणि 6E मुळे हायस्पीड फाईल शेअरिंग आणि 4K स्ट्रीमिंगची सुविधा अनुभवता येते. त्याशिवाय ब्ल्युटूथ ५.२ आणि विविध यूएसबी पोर्टमुळे कनेक्टिव्हिटीचे अनेक पर्याय युजर्सना या लॅपटॉपच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे.

इतर वैशिष्ट्ये

एसर प्युरिफाईडव्हॉईस या तंत्रज्ञानामुळे युजर्सना ऑनलाईन मीटिंग, तथा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवेळी अनावश्यक आवाज काढून टाकला जातो. तसेच टीएनआर सोल्युशनमुळे फोटो आणि व्हिडिओमधील खराब पिक्सल शोधून त्याला इतर पिक्सलमध्ये ब्लेंड केले जाते, जेणेकरून युजरला उत्तम फोटो आणि व्हिडिओ क्वालिटीचा आनंद अनुभवता येतो. अशा प्रकारचे विविध फीचर्स असलेला हा लॅपटॉप बाजारात ६२,९९० रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT