Whatsapp new features
Whatsapp new features Sakal
विज्ञान-तंत्र

टेक्नोहंट : व्हॉट्सअ‍ॅपची नवी फिचर्स

ऋषिराज तायडे

जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया म्हणून ओळख असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपकडून नेहमीच नवनवी फिचर्स आणले जातात.

जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया म्हणून ओळख असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपकडून नेहमीच नवनवी फिचर्स आणले जातात. नुकतेच रिअ‍ॅक्ट इमोजीज आणि ३२ जणांचा ग्रुप व्हॉईस कॉल आदी वैशिष्ट्ये आली. त्यानंतर आता व्हॉईस म्युट, डीपी हाईड आदी नवी फिचर्स लॉन्च करण्यात आली आहेत.

व्हॉईस म्यूट

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉईस कॉलिंगची फिचर्स अद्ययायवत करत जवळपास ३२ जणांना एकत्र गप्पा मारण्याची मस्त सुविधा उपलब्ध केली होती. मात्र, ३२ जणांच्या व्हॉईस कॉलिंगमध्ये नेमकं कोण काय बोलतोय, हे समजणं जरा कठीणच. तसेच कधी-कधी ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये कुणी आक्षेपार्ह बोलतं किंवा कुणी आपलंच म्हणणं रेटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक अनेकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉईस म्यूटचं फिचर आणलंय. त्यानुसार ग्रुप व्हॉईस कॉलिंगच्या होस्टला एखाद्या व्यक्तीचा आवाज म्यूट करता येणार आहे. दरम्यान, यासोबतच ग्रुप कॉलिंगदरम्यान एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवता येणार आहे. त्यामुळे कॉलिंगदरम्यान एखाद्या व्यक्तीला ठराविक मुद्दा सुचवायचा असल्यास या फिचरची मदत होईल.

फ्रोफाईल हाईड

व्हॉट्सअ‍ॅपवरील आपला प्रोफाईल, लास्ट सीन आदी वैयक्तिक माहिती नेमकी किती लोकांना दाखवायची किंवा दाखवायची नाही, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर ‘एव्हरीवन’, ‘माय कॉन्टॅक्ट’ आणि ‘नोबडी’ हे तीन पर्याय उपलब्ध होते. नव्या अपडेटमध्ये ‘माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट’ हे नवे फिचर उपलब्ध झाले. त्यानुसार काही ठराविक लोकांना आपला प्रोफाईल फोटो आणि लास्ट सीन पाहण्यासाठी मर्यादित करता येणार आहे. अ‍ॅण्ड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना त्यांच्या खासगीपणा अधिक जपता येणार आहे.

नव्याने येणारी फिचर्स

सदस्यत्व मान्यता

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला सहभागी व्हायचे असल्यास आतापर्यंत अ‍ॅडमीन त्याला अ‍ॅड करत होता किंवा इन्व्हाईट हायरलिंकद्वारे त्याला थेट सहभागी होत येत होते. लिंकद्वारे कोणताही व्यक्ती कोणत्याही ग्रुपमध्ये सहजपणे सहभागी होतो. त्यामुळे ग्रुपमध्ये अनावश्यक लोकांची ग्रुपमध्ये गर्दी वाढते. ही बाब लक्षात घेता व्हॉट्सअ‍ॅपच्या आगामी नव्या फिचरमध्ये लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अ‍ॅडमीनकडे रिक्वेस्ट पाठवावी लागणार आहे. अ‍ॅडमिनने रिक्वेस्ट स्वीकारली, तरच संबंधित व्यक्तीला ग्रुपमध्ये सहभागी होता येणार आहे. लवकरच हे फीचर उपलब्ध होणार आहे.

मिस्डकॉल अलर्ट

एखाद्यावेळी नेटवर्क नसल्यास मोबाईलवर मिस्ड कॉल अलर्टची सुविधा टेलिकॉम कंपन्यांकडून आपल्याला पुरवली जाते. त्याचप्रमाणे लवकरच व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगसाठीही मिस्ड कॉल अलर्ट उपलब्ध होणार आहे. याबाबतची चाचपणी कंपनीकडून सुरू असून सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपच्या आयओएस प्लॅटफॉर्मवरील बिझनेस युजर्सना ही सुविधा उपलब्ध होईल. त्यानुसार युजर्सचं इंटरनेट बंद असेल किंवा त्याचा स्मार्टफोन ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडवर असल्यास, त्यादरम्यान आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप कॉलचे मिस्ड कॉल अलर्ट त्याला स्मार्टफोनवर मिळतील. प्रायोगिक तत्त्वावर हे फिचर यशस्वी झाल्यास ते इतर युजर्सलाही उपलब्ध केले जाईल, असे डब्ल्यूएबीटाइन्फोच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT