Luna 25 Moon First Picture eSakal
विज्ञान-तंत्र

Luna 25 : अखेर चंद्राची लपलेली बाजू आली समोर; रशियाच्या 'लूना 25'ने पाठवला पहिला फोटो

Russia Moon Mission : 11 ऑगस्ट रोजी 'लूना 25'चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.

Sudesh

Russia's Lunar Spacecraft : रशियाचा लूना 25 हा उपग्रह चंद्राच्या कक्षेत पोहोचला आहे. 11 ऑगस्ट रोजी याचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यानंतर अवघ्या सहा दिवसांमध्ये त्याने चंद्रापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. यानंतर आता या उपग्रहाने चंद्राच्या आतापर्यंत लपून राहिलेल्या भागाचा पहिला फोटो शेअर केला आहे.

रशियाची अंतराळ संशोधन संस्था रॉस्कॉस्मॉसने आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा फोटो शेअर केला आहे. सध्या लूना 25 हे चंद्राच्या मागच्या बाजूला असल्यामुळे ते आपल्याला पृथ्वीवरुन दिसत नाही. मात्र, चंद्राच्या या बाजूचा फोटो या उपग्रहाने पाठवला आहे. भारताचं चांद्रयान 3 देखील याच भागात आहे.

रशियाचा अनोखा विक्रम

यापूर्वी सोव्हिएत रशियाने लूना 3 मोहिमेतून चंद्राच्या सर्वात दूरच्या भागाचा फोटो घेतला होता. यानंतर आता कित्येक वर्षांनंतर चंद्राच्या लपलेल्या भागाचा पहिला फोटो घेण्याचा मानही रशियाच्याच 'लूना 25'ला मिळाला आहे.

झीमन क्रेटर

चंद्राच्या या फोटोमध्ये झीमन नावाचं क्रेटर दिसत आहे. चंद्रावरील मोठ्ठ्या खड्ड्यांना क्रेटर म्हटलं जातं. Zeeman क्रेटर अगदीच अद्वितिय आहे. या क्रेटरमध्ये सुमारे 7,570 मीटर उंचीचा एक पर्वत देखील आहे.

कधी होणार लँड?

लूना 25 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणार आहे. याठिकाणी उतरून ते चंद्रावरील माती आणि दगडांचे सॅम्पल गोळा करेल. चंद्राच्या ध्रुवाजवळ पाण्याचे अंश शोधण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. 21 ऑगस्ट रोजी लूना 25 हे चंद्रावर उतरेल.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT