Galaxy F42 Google
विज्ञान-तंत्र

Samsung F सीरीजचा पहिला 5G फोन, 29 सप्टेंबरला होणार लॉंच

सकाळ डिजिटल टीम

Samsung F सीरीजमधील पहिला 5G स्मार्टफोन Galaxy F42 5G लाँचची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या लॉंचची तारीख कन्फर्म करताना या फोनची काही फीचर्सबद्दल देखील माहिती दिली आहे. फोनची विक्री सुरू होण्यासाठी मात्र ग्राहकांना ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कपनीने दावा केला आहे की, गॅलेक्सी F42 5G हा स्मार्टफोन 12 5G बँडला सपोर्ट करणारा Galaxy F सीरिजमधील पहिला स्मार्टफोन असेल. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G चे फीचर्स

हा स्मार्टफोन लाँच करण्यापूर्वी सॅमसंगने Galaxy F42 5G स्मार्टफोनची मायक्रो वेबसाइट लाईव्ह केली आहे. त्यानुसा सॅमसंग गॅलेक्सी F42 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये बॅकला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्याचा मुख्य कॅमेरा 64MP चा असेल. हा फोन सुपर नाईट मोडसह येईल. तसेच Galaxy F42 5G स्मार्टफोनमध्ये स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. तसेच हा फोन FHD + डिस्प्लेने सुसज्ज असेल. पॉवर बॅकअपसाठी सॅमसंग ग्लॅक्सी F42 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल.

Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होणार आहे. हा फोन Samsung.com आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट व्यतिरिक्त रिटेल आउटलेट स्टोअरवर देखील विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

किंमत काय असेल?

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G स्मार्टफोन 20,000 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप कंपनीकडून फोनची अधिकृत किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; ख्रिसमसमुळे गुंतवणूकदार सावध; मात्र ओला इलेक्ट्रिकचे शेअर चर्चेत

Netflix जाम केलं अशी वेब सिरिज... थरार, सस्पेंस अन् ट्विस्ट, महाराष्ट्रात Google ट्रेंडमध्ये अव्वल, ख्रिसमस सुट्टीत मिस करू नका

Ayyappa Devotee Case : घरच्यांनी अय्यप्पा स्वामींची माळ घालू न दिल्याने 14 वर्षीय मुलाने घेतला गळफास; आईचा हृदय पिळवटणारा आक्रोश

Kolhapur Flashback : तीन वेळा महापौरपद हुकले, तरीही न डगमगलेले नेतृत्व; बळिराम पोवारांची जिद्दी राजकीय कहाणी

PMC Election: एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा, भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या उंबरठ्यावर! राजकीय भूकंप येणार?

SCROLL FOR NEXT