Samsung Galaxy F04 Sakal
विज्ञान-तंत्र

Upcoming Phone: Samsung करणार धमाका! आणणार ८ हजारांच्या बजेटमधील स्मार्टफोन; फीचर्स लीक

Samsung Galaxy F04 पुढील महिन्यात लाँच होणार आहे. या फोनची किंमत ८ हजार रुपयांच्या बजेटमध्ये असू शकते.

सकाळ डिजिटल टीम

Samsung Galaxy F04 Features Leaked: सॅमसंग लवकरच कमी बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी Samsung Galaxy F04 या नावाने फोनला सादर करणार असून, लाँचनंतर हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. एफ-सीरिजमधील या एंट्री लेव्हल स्मार्टफोनला कंपनी जानेवारी महिन्यात लाँच करणार आहे.

सॅमसंगने फोनच्या टीझरला जारी करण्यास सुरुवात केली आहे. लाँचआधीच या हँडसेटची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहे. फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि ८ जीबी रॅम मिळेल. Samsung Galaxy F04 च्या लीक फीचर्सविषयी जाणून घेऊया.

Samsung Galaxy F04 ची किंमत

Samsung Galaxy F04 ला कंपनी फक्त ७,४९९ रुपये किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. हा एंट्री लेव्हल फोन पर्पल आणि ग्रीन अशा दोन रंगात येईल. यामध्ये ८ जीबीपर्यंत रॅम मिळेल. कंपनीने फोनच्या लाँच तारखेबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी जानेवारी २०२३ मध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Samsung Galaxy F04 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F04 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, जो वॉटर ड्रॉप स्टाइल नॉचसह येईल. रियर साइडला एलईडी फ्लॅश देखील मिळेल. फोनचे डिझाइन काही प्रमाणात सॅमसंग एम१३ ५जी सारखे असेल. तसेच, ८ जीबीपर्यंत रॅम दिली जाईल.

सॅमसंगचा हा फोन काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Samsung Galaxy A04e चे रिब्रँडेड व्हर्जन असू शकता. या फोनमध्ये कंपनीने ६.५ इंच डिस्प्ले, ५००० एमएएचची दमदार बॅटरी, फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोन अँड्राइड १२ आधारित One UI वर काम करतो. यात मीडियाटेक हीलियो पी३५ प्रोसेसर दिला आहे.

हेही वाचा: Recharge Plans: दररोज २.५ जीबी डेटासह येणारे सर्वात स्वस्त प्लॅन्स, डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन फ्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT