Samsung Galaxy F06 5G Mobile Price Features esakal
विज्ञान-तंत्र

Samsung 5G Mobile : खुशखबर! फक्त 10 हजारात लाँच झाला Samsung Galaxy 5G मोबाईल, ब्रँड कॅमेरा अन् जबरदस्त फिचर्स बघा एका क्लिकवर

Samsung Galaxy F06 5G Mobile Price Features : सॅमसंगने Galaxy F06 5G स्मार्टफोन 9,499 रुपयांमध्ये लाँच केला आहे, ज्यात 6.7-इंच डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसारखी आकर्षक वैशिष्ट्ये आहेत.

Saisimran Ghashi

Galaxy F06 5G Smartphone : भारतातील ग्राहकांसाठी सॅमसंगने आपला सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन Galaxy F06 5G सादर केला आहे. अवघ्या 9,499 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या हँडसेटमुळे आता 5G नेटवर्क अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आकर्षक Ripple Glow फिनिश, 6.7-इंच HD+ डिस्प्ले, आणि 5000mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन दमदार फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे.

आकर्षक डिझाइन आणि डिस्प्ले

Samsung Galaxy F06 5G चा Ripple Glow फिनिश त्याला स्टायलिश लुक देतो. हा फोन प्रकाशाच्या किरणांमुळे चमकत असल्याने त्याचा लूक अधिक आकर्षक वाटतो. यामध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला असून, 800 निट्स ब्राइटनेसमुळे उजेडातही स्क्रीन सहज दिसते. हा फोन 8mm जाड आणि 191 ग्रॅम वजनाचा असून, तो Bahama Blue आणि Lit Violet या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

प्रोसेसर आणि बॅटरी

Samsung Galaxy F06 5G मध्ये MediaTek D6300 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो उत्तम परफॉर्मन्स देतो. यासोबत 5000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो, त्यामुळे जास्तवेळ बॅटरी टिकते.

दमदार कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP वाइड अँगल मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा असून, उत्तम फोटो क्लिक करता येतात.

किंमत आणि उपलब्धता

Galaxy F06 5G हा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

4GB RAM + 128GB स्टोरेज – ₹9,499

6GB RAM + 128GB स्टोरेज – ₹10,999

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सुरुवातीच्या खरेदीदारांसाठी 500 रुपये कॅशबॅक ऑफर देखील आहे.

Samsung चा भविष्यातील फ्लॅगशिप स्मार्टफोन

याशिवाय, Samsung लवकरच आपला प्रीमियम स्मार्टफोन Galaxy S25 Edge सादर करणार आहे. हा फोन एप्रिल किंवा मे मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. लिक्सनुसार, मोठ्या डिस्प्लेसह हा फोन हलक्या वजनाचा असेल.

10,000 रुपयांच्या बजेटमध्ये दमदार फीचर्स असलेला Samsung Galaxy F06 5G हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. 5G नेटवर्कच्या विस्तारासोबतच हा फोन भारतीय बाजारात नवा विक्रम प्रस्थापित करू शकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT