Samsung Galaxy M Series Smartphone Launch esakal
विज्ञान-तंत्र

Samsung Galaxy M Series : बजेटमध्ये लाँच झाली Samsung Galaxy M सीरिज, जबरदस्त फीचर्स, किंमत अन् सर्व डिटेल्स वाचा एका क्लिकवर

Samsung Galaxy M Series Smartphone Launch : सॅमसंग आज गॅलेक्सी M16 आणि गॅलेक्सी M06 5G स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. नवीन डिझाइन, ट्रिपल रियर कॅमेरा आणि MediaTek Dimensity 6300 SoC सोबत या स्मार्टफोनमध्ये 5G क्षमता असेल.

Saisimran Ghashi

Samsung Galaxy M Series Smartphone Launch : सॅमसंग कंपनी आज 27 फेब्रुवारीला आपल्या लोकप्रिय M सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन्स Galaxy M16 आणि Galaxy M06 5G भारतीय बाजारात सादर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या फोनबाबत अनेक टीझर्स समोर आले होते, आणि अखेर कंपनीने त्यांच्या अधिकृत लॉन्चची घोषणा केली आहे.

नवीन स्मार्टफोन्समध्ये काय खास?

सॅमसंग Galaxy M16 आणि Galaxy M06 5G हे मागील वर्षी लाँच झालेल्या Galaxy M15 आणि M05 चे अपडेटेड व्हर्जन असणार आहेत. या नवीन फोनमध्ये दमदार प्रोसेसर, सुधारित कॅमेरा सेटअप आणि आकर्षक डिझाईन पाहायला मिळणार आहे.

डिझाईन आणि कॅमेरा सेटअप-

Samsung Galaxy M16-

  • ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप

  • पिल-शेप डिझाईन असलेले कॅमेरा मॉड्यूल

  • LED फ्लॅश कॅमेरा मॉड्यूल

Samsung Galaxy M06 5G

  • ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप

  • टॉप-लेफ्ट कोपऱ्यात पिल-शेप कॅमेरा मॉड्यूल

  • LED फ्लॅश.

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स

Geekbench लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy M06 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 SoC प्रोसेसर आणि 8GB RAM असणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्स Android 14 वर आधारित One UI 6 वर चालणार आहेत.

लॉन्च डेट आणि उपलब्धता

ही नवीन M सिरीज 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता Amazon India वर अधिकृतपणे लाँच झाली. अमेझॉनच्या लँडिंग पेजवर या स्मार्टफोन्सचा डिझाईन टीझर आधीच समोर आला आहे.

Samsung Galaxy M16 आणि M06 5G चे अधिकृत स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि विक्रीबाबतची माहिती लाँच इव्हेंटमध्ये समोर येईल. भारतीय ग्राहकांना बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोनच्या शोधात हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT