Samsung Galaxy S25 Ultra Discount Offer : जर तुम्ही सध्या एक अत्याधुनिक आणि प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या अॅमेझॉनच्या Great Summer Sale मध्ये अनेक स्मार्टफोनवर मोठ्या सवलती मिळत आहेत आणि विशेष म्हणजे Samsung Galaxy S25 Ultra या हायएंड स्मार्टफोनवर तब्बल ४२ हजारांची सवलत मिळत आहे. ही सवलत विविध एक्सचेंज आणि डायरेक्ट डिस्काउंटच्या स्वरूपात दिली जात आहे.
Galaxy S25 Ultra ची मूळ किंमत १,२९,९९९ रुपये आहे. मात्र अॅमेझॉनवर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटवर थेट १८% म्हणजेच २४ हजारांची सवलत देण्यात येत आहे, त्यामुळे किंमत १,०५,९९९ रुपये इतकी होते. याशिवाय, जुन्या फोनच्या एक्सचेंजवर अतिरिक्त सवलतही मिळते. उदाहरणार्थ जर तुम्ही 256GB स्टोरेज असलेला iPhone 12 एक्सचेंज केला तर तुम्हाला १८,३५० पर्यंतचे एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. अशात Galaxy S25 Ultra फक्त ८७,६४९ मध्ये मिळू शकतो.
Samsung Galaxy S25 Ultra मध्ये जबरदस्त Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला असून, यात 6.9 इंचाचा शानदार Dynamic 2X AMOLED डिस्प्ले आहे जो विलक्षण व्हिज्युअल अनुभव देतो. 5000mAh क्षमतेची बॅटरी 45W फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते, त्यामुळे दिवसभर फोन वापरूनही बॅटरीची चिंता राहत नाही.
फोटोग्राफी प्रेमींसाठी यात 200MP चा मुख्य कॅमेरा दिला आहे, जो चांगल्या क्वालिटीचे फोटो क्लिक करतो. याशिवाय, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि दोन 12MP सेन्सर्स आहेत. सेल्फी व व्हिडीओ कॉलसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
हा स्मार्टफोन OneUI 7 वर चालतो जो Android 15 आधारित आहे. यामध्ये Google Gemini AI सपोर्टही मिळतो ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन अनुभव अधिकच स्मार्ट होतो.
दरम्यान, गेल्या वर्षी लॉन्च झालेला Galaxy S24 Ultra देखील सवलतीत उपलब्ध आहे. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला हा व्हेरिएंट आता फक्त ८४,९९९ रुपयांमध्ये मिळू शकतो.
जर तुम्हाला एक अत्याधुनिक कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसर आणि भव्य डिस्प्ले असलेला स्मार्टफोन हवा असेल, तर सध्या Samsung Galaxy S25 Ultra वर मिळणारी सवलत ही एकदम बेस्ट संधी ठरू शकते. ही ऑफर मर्यादित काळासाठी असून स्टॉक संपण्यापूर्वी खरेदी करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.