Samsung Galaxy eSakal
विज्ञान-तंत्र

Samsung Galaxy : सॅमसंगचे दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; पाहा Z Flip 5 आणि Fold 5 चे फीचर्स अन् किंमत

या मेगा इव्हेंटमध्ये सॅमसंगने आपले आणखी काही प्रॉडक्ट्स देखील लाँच केले.

Sudesh

सॅमसंगने बुधवारी एका मेगा इव्हेंटमध्ये आपले बरेच नवीन प्रॉडक्ट्स लाँच केले. यामध्ये फोल्डेबल फोन, स्मार्टवॉच आणि टॅबलेट्सचा समावेश होता. या इव्हेंटमध्ये सॅमसंगने आपले दोन फोल्डेबल स्मार्टफोन देखील लाँच केले. गॅलेक्सी झी फोल्ड 5 आणि गॅलेक्सी झी फ्लिप 5 असे हे दोन स्मार्टफोन आहेत.

Galaxy Z Flip 5

सॅमसंगच्या झी फ्लिप सीरीजमधील हा नवा स्मार्टफोन आहे. यामध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. यातील मुख्य डिस्प्ले हा 6.7 इंच मोठा आहे. हा डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. तर कव्हर स्क्रीन ही 3.4 इंच मोठी आहे. यामध्ये सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. मेन स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, तर कव्हर स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz आहे.

यामध्ये 12MP+12MP असा ड्युअल रेअर कॅमेरा मिळतो. तर सेल्फीसाठी 10MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर आहे. तसंच, यात 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज पर्यंतचे ऑप्शन उपलब्ध आहेत. यातील बॅटरी 3,700 mAh क्षमतेची आहे, जी 25W वायर्ड आणि फास्ट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

गॅलेक्सी झी फ्लिप 5 स्मार्टफोनमध्ये मिंट, ग्रॅफाईट, क्रीम आणि लव्हेंडर असे चार कलर ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त ग्रे, ब्लू, ग्रीन आणि येलो हे ऑप्शनदेखील उपलब्ध आहेत, मात्र हे केवळ सॅमसंगच्या वेबसाईटवरून खरेदी करता येतील.

Galaxy Z Fold 5

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 7.6 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. तर याचा कव्हर डिस्प्ले हा 6.2 इंच आहे. या दोन्ही स्क्रीन अ‍ॅमोलेड आहेत, आणि या दोन्हीचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 12MP अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 50MP वाईड अँगल लेन्स आणि 10MP टेलिफोटो लेन्स आहे.

यामध्ये दोन फ्रंट कॅमेरे आहेत. यातील एक 10MP कॅमेरा कव्हर स्क्रीनवर आहे, तर अंडर डिस्प्ले कॅमेरा हा 4MP क्षमतेचा आहे. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 1TB स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहे. यातील बॅटरी 4,400 mAH एवढी आहे, जी 25W वायर्ड आणि फास्ट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. वायरलेस पॉवर शेअरिंगचं फीचरही यात देण्यात आलं आहे.

वरील दोन्ही स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे. तसंच हे दोन्ही फोन अँड्रॉईड 13 वर आधारित One UI 5.1.1 या ओएसवर काम करतात.

किती असेल किंमत?

Galaxy Z Flip 5 च्या 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 99,999 रुपये आहे. तर, 8GB+512GB व्हेरियंटची किंमत 1,09,999 रुपये आहे. Galaxy Z Fold 5 च्या 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 1,54,999 रुपये आहे. 12GB+512GB व्हेरियंटची किंमत 1,64,999 रुपये आहे. तर, 12GB+1TB व्हेरियंटची किंमत 1,84,999 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ'मधील गैरव्यवहाराची ‘ईडी’कडून चौकशी करा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT