Samsung
Samsung  esakal
विज्ञान-तंत्र

Samsung ने लॉन्च केले 4K आणि 8K टीव्ही ; फीचर्स ऐकून बसेल धक्का

सकाळ डिजिटल टीम

Samsung : samsung ने या वर्षाच्या सुरुवातीला CES 2023 मध्ये Neo QLED TV ची नवीन सीरिज लाँच केली आहे. आता कंपनीने ही सिरीज भारतातही लॉन्च केली आहे. Neo QLED 4K आणि 8K टीव्ही भारतात सादर करण्यात आले आहेत. मिनी-एलईडी डिस्प्लेसह अनेक पॉवरफुल फीचर्ससह हे प्रीमियम स्मार्ट टीव्ही आहेत.

Samsung Neo QLED 4K आणि 8K टीव्हीचे फीचर्स:

या दोन्ही टीव्हींमध्ये 4K आणि 8K रिझोल्यूशनमध्ये QLED मिनी-LED बॉर्डरलेस डिस्प्ले पॅनेल आहेत. सॅमसंग स्वतःच्या एज-टू-एज डिस्प्लेसह येतो, याला इन्फिनिटी स्क्रीन आणि इन्फिनिटी वन डिझाइन म्हटले जाते. दोन्हीकडे 4000 nits पर्यंत ब्राइटनेससह 120Hz रिफ्रेश रेट आहे. हे जगातील पहिले पॅन्टोन डिस्प्ले पॅनेल असल्याचे मानले जाते. सॅमसंगचा दावा आहे की टीव्ही 2,030 पँटोन प्रॉडक्शन्स करू शकतो.

त्यांचे डिस्प्ले सॅमसंग न्यूरल क्वांटम प्रोसेसरसह येतात जे 14 बिट प्रोसेसिंग आणि एआय अपस्केलिंगसह सुसज्ज आहेत. या लाइनअपमध्ये HDR10, HDR10+, HDR10+ Adaptive सह इतर अनेक सर्टिफिकेट दिली गेली आहेत.

यामध्ये गेम सेंट्रिक फीचर्स देण्यात आले आहेत. 2023 निओ क्यूएलईडी लाइनअप जगातील पहिल्या वायरलेस डॉल्बी अॅटमॉस आणि ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साउंड प्रो सिस्टमसह सादर करण्यात आले आहे. यामध्ये सॅमसंगचे Q Symphony 3.0 तंत्रज्ञान देखील आहे, जे टीव्ही स्पीकर आणि सॅमसंग साउंडबारमधून येते. 2023 Samsung Neo QLED लाइनअपच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये IoT Hub, Samsung TV Plus, Samsung Knox Vault हार्डवेअर चिप द्वारे 100+ मोफत चॅनेल यांचा समावेश आहे.

Samsung Neo QLED 4K आणि 8K TV ची किंमत आणि उपलब्धता:

Samsung Neo QLED 4K आणि 8K टीव्ही भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरसह सॅमसंग रिटेल स्टोअर्स, आघाडीच्या ऑफलाइन इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे सर्व प्रकार उपलब्ध केले जातील.

Neo 4K मॉडेल 1,41,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. तर 8K मॉडेल 3,14,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. तुम्ही 25 मे पूर्वी 8K टीव्हीची प्री-ऑर्डर केल्यास, तुम्हाला 99,990 रुपयांचा सॅमसंग साउंडबार HW-Q990 मोफत मिळेल. त्याच वेळी, 4K टीव्ही ऑर्डर केल्यास सॅमसंग साउंडबार HW-Q800 मोफत मिळेल, ज्याची किंमत 44,990 रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT