Samsung's Budget Smartphone  esakal
विज्ञान-तंत्र

Samsung's Budget Smartphone : सॅमसंगचे 'बजेट स्मार्टफोन' होणार लॉन्च, नव्या फीचर्ससह किंमत 15000 पेक्षा कमी

सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीच्या आधी सरप्राइज गिफ्ट देत आहे

सकाळ डिजिटल टीम

Samsung's Budget Smartphone : सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीच्या आधी सरप्राइज गिफ्ट देत आहे. कंपनीमार्फत नवे बजेट फोन लवकरच भारतात लॉन्च होणार असून ग्राहकांना आणखी पर्याय मिळावे यासाठी ही नवीन सीरिज सुरू होत आहे. कंपनीने प्रीमियम Galaxy S23 सीरिज काही महिन्यांपूर्वीच लॉन्च केली होती. आता सॅमसंग नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Samsung Galaxy A05 आणि Galaxy A05s लवकरच भारतीय बाजारात येतील.

सॅमसंग हा भारतातील आणि जगभरातील लाखो ग्राहकांचा आवडता ब्रँड आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे स्मार्टफोन बनवण्यासाठी कंपनीची ख्याती आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने आपली प्रीमियम स्मार्टफोन सीरिज म्हणजेच Samsung Galaxy S23 लॉन्च केली होती. आता कंपनी आपला नवीन 'बजेट स्मार्टफोन' बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यात Samsung Galaxy A05 आणि Galaxy A05s हे नवे मॉडेल्स असतील. कंपनीने अलीकडेच हे दोन्ही मॉडेल्स मलेशियामध्ये लॉन्च केले होते. मात्र, त्यांची किंमत उघड केली नव्हती. आता हे दोन्ही स्मार्टफोन सॅमसंग कंपनी भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

नव्या मॉडेल्सची किंमत

सॅमसंगचे हे बजेट फोन लवकरच भारतात लॉन्च होतील. अप्रतिम फीचर्ससह किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल, असं कळतंय.यासंबंधी यासंदर्भात कंपनीने माहिती दिली की, Samsung Galaxy A05 आणि Galaxy A05s पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होतील. यातील Galaxy A05 ची किंमत 13,000 रुपयांपेक्षा कमी असेल. तर Galaxy A05s ची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

उत्तम फीचर्स

सॅमसंगच्या दोन्ही मॉडेल्समध्ये उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.तुम्हाला Galaxy A05s मध्ये 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळेल. तर Galaxy A05 मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे.. Galaxy A05s मध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर दिला जाईल. तर Galaxy A05 मध्ये तुम्हाला MediaTek चा Helio G85 चीपसेट मिळेल. या दोन्ही फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज पर्याय असेल. यामुळे मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतात.

ट्रिपल कॅमेरा आणि बरंच काही...

Galaxy A05s मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP वाइड अँगल लेन्स, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. यामध्ये एक 13MP फ्रंट कॅमेरा पण आहे. जर आपण Galaxy A05 बद्दल बोललो तर यात 50MP वाइड अँगल प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा असेल. याशिवाय फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. दोन्ही फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरीची सोय करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT