Satara Latest Marathi News 
विज्ञान-तंत्र

'ही' स्मार्ट घड्याळं घालून लुटू शकता पोहण्याचा आनंद; जाणून घ्या किंमत आणि भन्नाट फिचर्स..

सकाळवृत्तसेवा

सातारा : सध्या बरीच स्मार्ट घड्याळे बाजारात उपलब्ध आहेत, जी तुमच्या आरोग्यावर आणि दैनंदिन कामांवर सहज नजर ठेवू शकतात. ही स्मार्ट घड्याळे आपल्या फोनशी देखील कनेक्ट होतात, त्याचबरोबर आपण कॉल आणि गाण्यांचा देखील आनंद यातून घेऊ शकता. याला टच स्क्रीन प्रदान केली आहे, जी आपल्याला बरीच उत्कृष्ट वैशिष्ट्ये वापरण्यास मदत करते. आज आपण अशाच काही स्मार्ट घड्याळांविषयी सांगणार आहात, जी कमी खर्चात बाजारात उपलब्ध आहेत.

boAt Storm 

बोट स्टॉर्म एक उत्तम स्मार्ट घड्याळ आहे, ज्याची किंमत सुमारे 2500 रुपये आहे. या घड्याळामध्ये भन्नाट फिचर्स असून आपल्या दैनंदिन जीवनात याचा अधिक उपयोग होणार आहे. दररोजच्या कार्याचा मागोवा घेण्यासाठी 9 खेळाच्या पद्धती यात समाविष्ट केल्या आहेत. आपण यावरून फोन कॉल, सूचना, मजकूर, गजर आणि रिमाइंडर मॅनेज व्यवस्थापित करू शकता. हे स्मार्ट घड्याळ तुमची झोप, हृदयाची गती, रक्तातील ऑक्सिजनाच्या पातळीचे परीक्षण करते. हे घड्याळ वॉटरप्रूफ असून ती पोहताना देखील वापरु शकता.

Amazefit Bip S

अमेजफिटच्या या स्मार्ट घड्याळाची किंमत सुमारे 4000 रुपये इतकी आहे. आरोग्य, दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी यात 1.28 इंचाचा कलर डिस्प्ले बसविण्यात आला आहे, शिवाय यात 10 स्पोर्ट्स मोड देखील बसविण्यात आले आहेत. या घड्याळाचा बॅटरी बॅकअप जबरदस्त असून एकदा बॅटरी चार्ज केली की, 15 दिवस  बॅटरी चार्ज केली नाही, तर चालू शकते.

Noise ColorFit Pro 2

नॉईज कलरफिटची स्मार्ट घड्याळ लोकांना खूप आवडली आहे. त्याची किंमत सुमारे 2999 रुपये असून या घड्याळात 1.3 इंचाची टचस्क्रीन बसवली आहे. यात आरोग्य आणि दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅक करण्यासाठी 9 पद्धती वापरल्या आहेत. याद्वारे आपण आपले फोन कॉल, संदेश, सूचना आणि संगीत देखील नियंत्रित करू शकता. या स्मार्ट घड्याळात आपले धावणे, योग तसेच हृदय गती शोधणे शक्य असून ही वॉटरप्रूफ स्मार्ट घड्याळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT