audio-book 
विज्ञान-तंत्र

‘ॲप’निंग  :  ‘ऐका’ पुस्तकं! 

सायली क्षीरसागर

पुस्तकं हा अनेकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. काहींना रिकाम्या वेळात, तर काहींना अगदी झोपण्यापूर्वीही पुस्तक वाचायची सवय असते. ज्यांना वाचनाची आवड असते, ते कुठेही आपला छंद जोपासतात. काही जण बाहेर जातानाही पुस्तक बरोबर घेऊन जातात. मात्र, तंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तशी पुस्तकांची जागा ‘ई-बुक्‍स’ने घेतली आणि आता ‘ई-बुक्‍स’च्या जागी ‘ऑडिओ बुक्‍स’ आले आहेत. आता पुस्तकं ‘वाचण्या’ऐवजी ‘ऐकण्याचा’ ट्रेंड रुजत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑडिओ बुक म्हणजेच ‘टॉकिंग बुक’. ही एक इंटरेस्टिंग आणि वेगळी संकल्पना व्यवसायाच्या दृष्टीनं १९९४ मध्ये प्रथम परदेशात अस्तित्वात आली व कालांतरानं भारतातही रुजली. एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा ते हावभावांसह ऐकणं कुणालाही आवडतं, याचाच विचार करून ‘ऑडिओ बुक’ ही संकल्पना सत्यात उतरली. कॅसेटच्या धर्तीवरच तांत्रिकदृष्ट्या पुढारलेली ही संकल्पना ‘ऑडिओ बुक’च्या माध्यमातून वाचकांसमोर आली व वाचक हीच पुस्तकं कुतूहलानं ऐकू लागले. ‘ऑडिओ बुक’चा सगळ्यात मोठा फायदा हा झाला, की वाचकाला कुठंही, कोणत्याही वेळी, कितीही गर्दीत आपल्या स्मार्ट फोनवर ॲपद्वारे किंवा संकेतस्थळावरून पुस्तकं ऐकता येऊ लागली.  ऐकण्याबरोबरच पुस्तकातल्या हावभावांमुळं डोळ्यांसमोर त्या कथेचं हुबेहूब वर्णन उभं राहू लागलं. पुस्तकातला पाण्याचा आवाज, लाटांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, जंगलातल्या गर्द झाडीचा आवाजही ऐकता येऊ लागला. याचं श्रेय जातं ते व्हॉईसओव्हर आर्टिस्टना. त्यांच्या आवाजामुळं दिग्गज साहित्यिकांच्या कादंबऱ्यांना श्राव्यरूप मिळालं. यापूर्वी ज्यांची पुस्तकं प्रकाशित झाली, त्यांनी त्याचं ‘ई-बुक’ व कालांतरानं ‘ऑडिओ बुक’ तयार करून घेतलं, तर काहींनी नव्या कथेसह ‘ऑडिओ बुक’ची निर्मिती केली.  

‘ई-बुक्‍स’मुळे कोणतेही पुस्तक बरोबर घेऊन जाण्याची गरज नव्हती. आपल्या हातातील स्मार्ट फोनमध्ये एखाद्या पुस्तकाची ऑनलाइन आवृत्ती सहज उपलब्ध होते. आता ‘ऑडिओ बुक्‍स’मुळे एका जागी थांबून वाचायचीही गरज पडत नाही. ‘ऑडिओ बुक्‍स’ ॲपमधून आपण पुस्तकं ऐकू शकतो. हेडफोन्स कानात घालून घरी निवांतपणे, प्रवासात, रिकाम्या वेळी, झोपण्याआधी कधीही मोबाईलवर आपण पुस्तकं ऐकू शकतो. ‘ऑडिओ बुक्‍स’ची अनेक ॲप्स आहेत, त्यापैकी ‘स्टोरीटेल’ हे ॲप ‘ऑडिओ बुक्‍स’मध्ये अग्रगण्य आहे. सोशल मीडिया वापरणारे अनेक जण ‘स्टोरीटेल’चे असंख्य चाहते आहेत. वाचकांना आता पुस्तकं वाचण्यापेक्षा ती हावभावांसह ऐकण्यात रस वाटू लागला आहे. ‘स्टोरीटेल’मध्ये मराठीसह अनेक इतर भाषांमधली पुस्तकं, कादंबऱ्या ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. जुन्या पुस्तकांपासून ते ताज्या पुस्तकांपर्यंत अनेक पर्याय या ॲपवर मिळतात. तसेच ‘ई-बुक’चा पर्यायही या ॲपवर मिळतो. अगदी सहजपणे ‘ई-बुक’ व ‘ऑडिओ बुक’ ‘स्टोरीटेल’ ॲपवर वापरायला मिळते. या ॲपसाठी सबस्क्रीप्शन गरजेचे आहे. 

‘ॲप’ची वैशिष्ट्ये 
  ई-बुक व ऑडिओ बुक ॲपवर उपलब्ध. 
  पुस्तकं ऐकण्याचा वेग ठरवता येतो. 
  स्नूज फंक्‍शन उपलब्ध. 
  बुकमार्क, नोट तयार करण्यासाठी सोय. 
  नवीन पुस्तकं सुचवता येतात. 
  लहान मुलांसाठी ‘किड्‌स मोड’चा पर्याय 
  मराठीसह इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध. 
  ‘ऑडिओ बुक्‍स’ची लायब्ररी तयार करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

SCROLL FOR NEXT