Science and Hindu Religion esakal
विज्ञान-तंत्र

Science and Hindu Religion : चक्क, मंदिराबाहेर उभारला हुबेहूब हत्ती रोबोट, पहाल तर थक्क व्हाल

साऊथच्या एका मंदिराबाहेर चक्क एक हत्तीचा रोबोट उभारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Robot Elephant For Religious Rituals : दाक्षिणात्य मंदिरांबाहेर हत्ती उभे करण्याची परंपरा आहे. याला फार शुभ मानलं जातं. पण केरळ राज्यात आता विज्ञानाच्या प्रगतीने या पारंपरिक रुढींना साद घालत एक अनोखा प्रयोग करू भाविकांना थक्क केलं आहे. या मंदिरांबाहेर उभ्या असणाऱ्या हत्तींना नीट सांभाळलं जात नाही म्हणून हत्ती उभे करण्याच्या परंपरेला विरोध केला जात होता. पण त्यावर विज्ञानाच्या सहाय्याने काढलेला हा तोडगा मात्र सर्वांना अचंबित करणारा ठरला.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) इंडिया आणि अभिनेत्री पार्वती थिरुवोथू यांनी त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजदप्पिल्ली श्रीकृष्ण मंदिराला यांत्रिक रोबोट दान केला आहे.

प्राणी कल्याण संस्था अनेक वर्षांपासून मंदिरातील प्राण्यांना "क्रूर" वागणूक देत असल्याची तक्रार करत आहेत. थोड्यादिवसांपूर्वीच, सेंटर फॉर रिसर्च ऑन अॅनिमल राइट्सने केरळच्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील बंदिस्त हत्तींच्या वाढत्या मृत्यूबाबत पत्र लिहिले होते.

पेटा काय सांगते?

2018 ते 2023 दरम्यान मोठ्या सस्तन प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले, पाच वर्षांच्या कालावधीत 138 हून अधिक बंदिस्त हत्तींचा मृत्यू झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

"आम्ही अशा प्रकारचे गैरवर्तन थांबवण्याच्या आणि प्राण्यांना आदरयुक्त आणि सन्माननीय जीवन जगू देण्याच्या दिशेने अधिक मजबूत आणि अधिक प्रभावी पाऊल उचलण्याची वेळ आली आहे," असे संस्थेने म्हटले आहे.

रोबोट हत्तीचे वैशिष्ट्ये

  • लोखंडी फ्रेमने बनवलेला हा रोबोट 11 फूट उंच आणि 800 किलो वजनाचा आहे.

  • हा उपक्रम सणासाठी जिवंत प्राण्यांचा वापर थांबवण्याच्या प्रतिज्ञाचा एक भाग आहे.

इतर मंदिरंपण यातून प्रेरणा घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

काही लोक या प्रयोगाला सकारात्मकतेने घेत आहेत तर काही यावर टिका करत आहे. हिंदू रुढींसोबत प्रयोग केले जात असल्याचा आरोप काही करत आहेत. तर काही लोक विज्ञान आणि धर्म एकत्र येऊ शकत नाही असं कोण म्हटलं, असं म्हणून प्रयोगाचं स्वागत करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकबराच्या बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हा...; कुंभमेळ्यावरून फडणवीस गरजले

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात येतोय शेतात राबणारा काळ्या आईचा पुत्र

माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !

Latest Marathi News Live Update : प्रभाग 59 मध्ये अपक्ष उमेदवार सचिन शिवेकर यांना मुंबई डबेवाला संघटनेचा पाठिंबा

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT