signal app banned in china
signal app banned in china 
विज्ञान-तंत्र

WhatsApp ला टक्कर देणाऱ्या Signal ऍपवरही चीनमध्ये बंदी

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: जगभरात प्रसिध्द असणारे सोशल मीडिया ऍप  WhatsApp ला टक्कर देणारं Signal ऍपवर चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या ऍपमध्ये व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) व्हीपीएनद्वारे ऍक्सेस केलं जाऊ शकत होतं. व्हीपीएन आपली खासगी आणि संवेदनशील माहिती संरक्षित करण्यासाठी कार्य करते. यापूर्वी चीनमध्ये फेसबुक, ट्विटर आणि अलीकडे लोकप्रिय होत असलेल्या अनेक सोशल मीडिया ऍप्सवर आणि मेसेजिंग ऍपवर बंदी घातली गेली आहे. आता Signal ऍपवरही बंदी घालण्यात आली आहे.

सिग्नल अ‍ॅप अचानक बंद पडल्यानंतर चिनी अधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकृत विधान केले नाही. चीनमध्ये सिग्नल ऍपचे यूजर्स तसे कमीच होते. चीनमध्ये आतापर्यंत सुमारे 5,10,000 लोकांनी हे ऍप डाउनलोड केले आहे.

Sensor Tower अहवालानुसार Apple अ‍ॅप स्टोअर वरून सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. जर सिग्नल ऍपने परदेशी प्लॅटफॉर्म व्हीपीएन वर मेसेज करणे चालू ठेवले तर कंपनीला कमी महसूल मिळेल. चीनमध्ये WeChat जास्त प्रसिध्द आहे. सुमारे 1 अब्ज वापरकर्ते WeChat वापरतात.

Signal यूजर्संना एंड-टू-एंड एनक्रिप्टेड मेसेजिंगची सेवा देते. याचा अर्थ असा की कंपनी किंवा अन्य कोणताही वापरकर्ता सिग्नल ऍपवरील संभाषणांमध्ये प्रवेश करू शकत नाही किंवा ते वाचू शकत नाही. हे देखील एक कारण असू शकतं की चीनने सिग्नल ऍप बंद केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT