Uranus day length hubble space telescope esakal
विज्ञान-तंत्र

Uranus Day Length : यूरेनस ग्रहावर एका दिवसाची लांबी किती? संशोधनातून समोर आली आश्चर्यकारक माहिती

Uranus day length hubble space telescope : हबल टेलिस्कोपच्या संशोधनातून यूरेनस ग्रहावरील एका दिवसाची अचूक लांबी ठरवण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले आहे.

Saisimran Ghashi

Uranus Day Length hubble telescope : अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे. शास्त्रज्ञांनी अखेर यूरेनस या दूरच्या वायुग्रहावरील एका दिवसाची अचूक लांबी शोधून काढली आहे. या ग्रहाचे फिरणे, त्याचा अक्ष आणि चुंबकीय क्षेत्र यामध्ये अनेक गुंतागुंतीच्या बाबी असल्यामुळे हा शोध अनेक दशकांपासून संशोधनासाठी एक आव्हान ठरला होता.

हबल स्पेस टेलिस्कोपने मागील १० वर्षांमध्ये केलेल्या ऑरोरा (ध्रुवीय प्रकाश) निरीक्षणांच्या आधारे वैज्ञानिकांनी सिद्ध केलं की यूरेनसला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी १७ तास, १४ मिनिटे आणि ५२ सेकंद लागतात. हे मोजमाप NASA च्या व्हॉयेजर 2 या यानाने १९८६ मध्ये दिलेल्या अंदाजापेक्षा २८ सेकंदांनी अधिक आहे.

यूरेनसचा स्वतःभोवती फिरण्याची पद्धत देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो अगदी आडवा होऊन फिरतो म्हणजे त्याचा फिरण्याचा अक्ष सुमारे ९८ अंशांनी कललेला आहे. शिवाय त्याचं चुंबकीय क्षेत्र खगोल उत्तर ध्रुवापासून ५९ अंशांनी दूर असल्याचंही संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

या संशोधनात शास्त्रज्ञांनी यूरेनसच्या चुंबकीय क्षेत्रातील रेडिओ लहरी आणि ऑरोराची मोजणी वापरून फिरण्याचा कालावधी अधिक अचूकपणे ठरवला.

विशेष म्हणजे यूरेनसला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जवळपास ८४ पृथ्वी वर्षे लागतात. या नव्या माहितीमुळे यूरेनसच्या पृष्ठभागाचे आधी तयार करण्यात आलेले काही नकाशे बदलावे लागतील, तसेच भविष्यात त्या ग्रहावर मोहीम पाठवायची असल्यास त्यासाठी अचूक नियोजन करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर शहरात ‘डीजे’चा आवाज १२० डेसिबलपेक्षा जास्त! पोलिस अन्‌ नेत्यांच्या कानात बोळे, अधिकारी झाले बधीर; आवाज मोजणाऱ्या पोलिसांकडील मशीन नावालाच

Jammu-Kashmir Rain Update : 'जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी'; कथुआत सात जणांचा मृत्यू; रेल्वेसेवाही विस्कळित

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

SCROLL FOR NEXT