venus 
विज्ञान-तंत्र

शुक्रा ग्रहावर जीवनाच्या पाऊलखुणा?

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शुक्र ग्रहावर फोस्फिन (phosphine) नावाचे संयुग सापडले आहे. पृथ्वी वगळता दुसऱ्या ग्रहावर असे जैविक संयुग सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. जैविक अभिक्रियेतून अशा संयुगांची निर्मिती होते. मात्र शुक्रावर जीवसृष्टी असल्याचा दावा शास्रज्ञ करत नाही. कदाचित पुढील संशोधनाने त्यावर प्रकाश पडेल. 

काय आहे फोस्पिन ?
फोस्फिन हे एक फोस्परस आणि तीन हायड्रोजन अणुपासून बनलेले संयुग आहे. (PH3) 

संशोधन महत्वाचे का?
शुक्र ग्रहाच्या वातावरणात आढळलेले फॉस्फिनचे प्रमाण तुलनेने खूप जास्त आहे. पृथ्वीवर, फॉस्फीनची निर्मिती विजेच्या आणि ज्वालामुखीच्या क्रियासारख्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे होऊ शकते. परंतु केवळ थोड्या प्रमाणात पृथ्वीवर फॉस्फिनच्या निर्मितीचे स्रोत आहे.

फोस्फिनच्या रुपात दुसऱ्या ग्रहावर पहिल्यांदा जैविक संयुग आढळले आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जीवनाच्या संभाव्य चिन्हाचा हा पहिला शोध आहे. परंतु जीवसृष्टीचा दावा करण्यासाठी आपल्याकडे कोणताच ठोस पुरावा नाही. 

कसा लागला शोध?
चिली (ALMA) आणि हवाई येथील दुर्बिणीच्या साहायाने शुक्र ग्रहावरून उत्सर्जित होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचे विश्लेषण करण्यात आले.फोस्फिन संयुगातील हाड्रोजन आणि फोस्परस ज्या वारांवरीतेला एकमेका भोवती हलतात तेवढ्याच वारांवरीतेच्या लहरी या दोन दुर्बिणीने टिपल्या. पुढील वैज्ञानीक संशोधनाने शास्रज्ञांना या संयुगाची खात्री झाली.

जैविक अभिक्रियेच्या मिळालेल्या या पाऊलखुणा निश्चितच माणसासाठी महत्वपूर्ण आहे. प्रत्यक्ष शुक्राच्या वातावरणात यान पाठवल्या नंतरच पुढची स्पष्टता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT