Sun Coronal Holes Monsoon Change in India esakal
विज्ञान-तंत्र

Sun Coronal Holes : सूर्यावर पडले खड्डे! भारतात उष्णता वाढून सुरू होणार अवकाळी पाऊस, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Sun Coronal Holes Monsoon Change in India : सौर कोरोनल होल्सची संशोधनामुळे भारतीय मान्सून पावसावर होणारा प्रभाव समजून घेतला आहे. सौर वाऱ्याच्या वेगाने आणि चुंबकीय क्षेत्रांच्या बदलामुळे हवामानात बदल होऊ शकतात, ज्यामुळे उपग्रहांवर परिणाम होतो.

Saisimran Ghashi

भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी सूर्यावर आढळणाऱ्या ‘कोरोनल होल्स’ म्हणजेच विशाल चुंबकीय छिद्रांच्या तपशीलवार अभ्यासातून हे छिद्र भारतातील मान्सून पावसावर परिणाम करू शकतात, असे स्पष्ट केले आहे. हा शोध अवकाशातील वातावरणाच्या अभ्यासासाठी तसेच मान्सून अंदाजासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सूर्यावरचे ‘कोरोनल होल्स’ आणि त्यांचा प्रभाव

‘कोरोनल होल्स’ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरील गडद आणि कमी घनतेचे प्रदेश, जिथे चुंबकीय क्षेत्र खुले असते. हे भाग सूर्याच्या वातावरणातून वेगाने बाहेर पडणाऱ्या सौर वाऱ्याचे स्रोत मानले जातात. हे वेगवान सौर वारे पृथ्वीच्या वातावरणावर प्रभाव टाकतात, त्यामुळे उपग्रह यंत्रणांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि हवामान बदलांवर परिणाम होतो.

भारतीय खगोलशास्त्र संस्थेच्या (IIA) संशोधकांनी आठ वर्षांच्या अवकाश वेधशाळा (SOHO) उपग्रहाच्या निरीक्षणांवर आधारित अभ्यास केला. यात कोरोनल होल्सच्या उष्णता आणि चुंबकीय क्षेत्राच्या संरचनेचे अचूक मापन करण्यात आले आहे.

या अभ्यासात संशोधकांना असे आढळले की कोरोनल होल्समधील चुंबकीय क्षेत्राची ताकद सूर्याच्या विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाढते. त्यामुळे हे छिद्र सूर्याच्या आतल्या खोल भागातून तयार होतात, असे संकेत मिळतात. सौर वाऱ्यामुळे पृथ्वीच्या वातावरणावर होणाऱ्या परिणामांमुळे मान्सूनमध्ये बदल होऊ शकतात.

सूर्यावरच्या या घटनांचा अभ्यास केल्यास हवामानशास्त्रज्ञांना भारतीय मान्सूनच्या बदलत्या स्वरूपाचा अधिक अचूक अंदाज घेता येईल. यामुळे हवामान अंदाज प्रणाली सुधारण्यास मदत होऊ शकते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT