Ninth Planet Science Research update esakal
विज्ञान-तंत्र

Ninth Planet : पृथ्वीपलीकडे सापडला नवा ग्रह! शास्त्रज्ञांचा ऐतिहासिक शोध; तिथे जीवन शक्य आहे का? चला जाणून घेऊया..

Ninth Planet Science Research : शास्त्रज्ञांनी प्लूटोनंतर एक नववा ग्रह शोधला असून त्यावर जीवन असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा ग्रह अतिशय थंड असून, सूक्ष्म जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता आहे.

Saisimran Ghashi

Ninth Planet Update : शास्त्रज्ञांनी अखेर पृथ्वीच्या पलिकडे एक अत्यंत रंजक आणि गूढ असा नववा ग्रह शोधून काढला आहे. प्लूटोच्या बाहेरील या नव्या ग्रहाच्या शोधासाठी जवळपास ४० वर्षांचा अभ्यास, निरीक्षणं आणि डेटा संकलन करण्यात आला आहे. तैवान, जपान आणि ऑस्ट्रेलियातील खगोलशास्त्रज्ञांनी मिळून हा ऐतिहासिक शोध लावला आहे.

नवव्या ग्रहाची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • सूर्यापासूनचे अंतर
    या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर ४६.५ अब्ज ते ६५.१ अब्ज मैलांदरम्यान आहे. इतक्या प्रचंड अंतरामुळे सूर्यप्रकाश तिथे अत्यंत क्षीण स्वरूपात पोहोचतो.

  • तापमान
    या ग्रहावरचे तापमान -३६४°F ते -४०९°F इतके अत्यंत थंड असू शकते, ज्यामुळे तो पूर्णतः बर्फाच्छादित असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

  • वस्तुमान आणि आकार
    या नवव्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा १७ पट अधिक असून, तो युरेनस किंवा नेपच्यून इतकाच मोठा आहे.

  • परिभ्रमण कालावधी
    या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तब्बल २५,००० वर्षे लागतात

या ग्रहावर जीवन शक्य आहे का?

शास्त्रज्ञांनी अभ्यासलेल्या १३ संभाव्य ग्रहांपैकी या नवव्या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अर्थात आपण ज्या स्वरूपातील जीवसृष्टीची कल्पना करतो झाडं, प्राणी, मानव तशी नाही पण अत्यंत कठीण आणि थंड हवामानातही टिकून राहणारे सूक्ष्म जीव (जसे की बॅक्टेरिया) येथे अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जर पाणी अस्तित्वात असेल, तर ते ग्रहाच्या गाभ्याजवळ खोलवर साठवलेले असू शकते. सूर्यप्रकाश जवळपास नसल्याने अशा जीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी वेगळ्या स्रोतांचा आधार घ्यावा लागेल कदाचित ग्रहाच्या अंतर्गत उष्णतेचा.

२०१६ मध्ये व्यक्त केलेल्या या ग्रहाच्या अस्तित्वाच्या शक्यतेला आता ठोस आधार मिळाला आहे. जगभरातील खगोलशास्त्रज्ञांसाठी ही एक ऐतिहासिक घटना असून भविष्यात यावर आधारित अनेक संशोधन प्रकल्प राबवले जाणार आहेत.

या शोधामुळे मानवजातीच्या “पृथ्वीबाहेरील जीवनाच्या” शोधाला नवी दिशा मिळू शकते. जगभरातील खगोलप्रेमी, वैज्ञानिक आणि संशोधक यांच्यात यामुळे प्रचंड उत्सुकता आणि उमेद निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT