Second Hand Bike Tips eSakal
विज्ञान-तंत्र

Second Hand Bikes: सेकंड हँड बाईक घेताना काय घ्यावी खबरदारी? 'या' टिप्स वाचवतील मोठं नुकसान

Tips To Buy Second Hand Bikes: सेकंड हँड दुचाकी खरेदी करताना काही गोष्टी तपासणं गरजेचं असतं..

Sudesh

Bike Buying Tips: आजच्या काळात घरी दुचाकी असणं ही चैन नाही तर गरजेची बाब झाली आहे. यामुळेच बाईक खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. ज्यांचं बजेट जास्त नाही ते लोक सेकंड हँड बाईकचा पर्याय निवडत आहेत. मात्र, अशी दुचाकी खरेदी करताना खबरदारी घेणं गरजेचं असतं.

तुम्हीदेखील सेकंड हँड बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दुचाकी खरेदी करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास तुमचा भरपूर फायदा होऊ शकतो.

बजेट

सेकंड हँड दुचाकी खरेदी करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला एक बजेट ठरवावं लागेल. त्यानुसार तुम्ही बाईकची कंपनी, क्षमता आणि इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकता. यामुळे तुमच्या बजेटमध्ये परफेक्ट अशी बाईक तुम्हाला मिळू शकेल. (Second Hand Bike)

रिसर्च

बाईक घेण्यापूर्वी त्याबद्दल जमेल तितकी माहिती घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता. कोणती सेकंड हँड बाईक उत्तम आहे याची माहिती देणाऱ्या कित्येक वेबसाईट्स उपलब्ध आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजेनुसार योग्य बाईक निवडू शकता.

कंपनी

तुम्ही कोणत्या कंपनीची बाईक घेत आहात हेदेखील पाहणं गरजेचं आहे. तुम्ही घेत असलेल्या गाडीच्या कंपनीचं सर्व्हिस सेंटर जवळ आहे याची खात्री करा. अन्यथा, भविष्यात गाडी दुरूस्ती किंवा सर्व्हिसिंगसाठी देखील तुम्हाला दूर जावं लागेल.

टेस्ट राईड

नवीन असो वा जुनी, गाडी खरेदी करताना टेस्ट राईड करणं गरजेचं असतं. जुनी गाडी घेताना तर याची अधिक गरज असते. टेस्ट राईड करताना गाडीचा काही आवाज येतोय का, इंजिन स्मूद आहे का, ब्रेक नीट लागतायत का यासोबतच इतर गोष्टीही तपासून घ्याव्यात.

कागदपत्रं तपासणी

सेकंड हँड बाईक खरेदी करताना आधीच्या मालकाकडे सर्व कागदपत्रं उपलब्ध आहेत का याची खात्री करून घ्यावी. आरसी बुक, विमा, चेसी नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, पीयूसी सर्टिफिकेट ही कागदपत्रं अप-टू-डेट असल्याची खात्री करावी. यासोबतच, ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक कागदपत्रं योग्य असल्याची पडताळणी करूनच पेमेंट करावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT