Hyundai i10 Asta Sunroof esakal
विज्ञान-तंत्र

झिरो डाऊन पेमेंटवर ३.२ लाखांत खरेदी करा Hyundai i10 Asta

कमी बजेट आणि जास्त मायलेजसाठी पसंतीस उतरणाऱ्या ह्युंदाई आय १०

सकाळ डिजिटल टीम

देशात कारमध्ये कमी बजेटमध्ये येणाऱ्या हॅचबॅक कार्समध्ये एक मोठी रेंज उपलब्ध आहे. यात मारुती, ह्युंदाई, टाटा यांसारख्या कंपन्यांचे कार्स आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कमी बजेट आणि जास्त मायलेजसाठी पसंतीस उतरणाऱ्या ह्युंदाई आय १० (Hyundai i10 Asta) विषयी. ती तुम्ही केवळ ३.२५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करु शकता. मात्र ऑफरविषयी सांगण्यापूर्वी या कारच्या फिचर्स आणि स्पेसिफिकेशनचे पूर्ण तपशील जाणून घ्या. ह्युंदाई आय १० एस्टा एक प्रीमियम हॅचबॅक आहे. त्यात कंपनीने प्रीमियम सनरुफसह लाँच केले होते.

- या कारचे इंजिन आणि पाॅवरविषयी बोलाल तर यात ११९७ सीसीचे इंजिन दिले आहे. जे ८० पीएसचे पाॅवर आणि ११०.४ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्याबरोबर ५ स्पीड मॅन्युएल गिअरबाॅक्स दिले आहेत.

- कार फिचर्समध्ये सनरुफसारखे प्रीमियम फिचर व्यतिरिक्त यात पाॅवर विंडो, पाॅवर स्टेअरिंग, एबीएस, फ्रंट फाॅग लाईट्स, फ्रंट सीटवर ड्युअल एअर बॅग, एअर कंडिशनसारखे फिचर दिले गेले आहेत. मायलेजच्या बाबत कंपनीचा दावा आहे, की ही कार १९.४ किलोमीटर प्रतिलीटरपर्यंत मायलेज देते.

- ह्युंदाई आय १० एस्टाचे फिचर्स जाणून घेतल्यानंतर आता या कारवर मिळणाऱ्या ऑफरविषयी जाणून घेऊया. या कारवर ऑफर दिले आहे, सेकंड हँड कार्सची खरेदी-विक्री करणारी वेबसाईट CARS 24 ने. तिने ही कार आपल्या वेबसाईटवर लिस्ट केली असून तिची किंमत आहे ३.२५ लाख रुपये.

- वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारचे माॅडल ऑगस्ट २०१२ चे आहे. तिची ऑनरशीप फर्स्ट आहे. ही कार आतापर्यंत ४७ हजार ६५० किलोमीटरपर्यंत धावली आहे. तिचे रजिस्ट्रेशन दिल्लीचे डीएल-३सी आरटीओ ऑफिसमध्ये नोंदविण्यात आली आहे. ही कार खरेदी केल्यावर कंपनी काही अटींसह सहा महिन्यांची वाॅरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे. ज्यांना ही कार लोनवर घ्यायची आहे, त्यांच्यासाठी कंपनी लोनची सुविधाही देत आहे. या लोन प्लॅनमध्ये झिरो डाऊन पेमेंटवर ही कार घरी घेऊन जाऊ शकता. तुम्हाला पुढील ६० महिन्यांपर्यंत ७ हजार ५२८ रुपये ईएमआय फेडावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT