Shubhanshu Shukla Latest Update esakal
विज्ञान-तंत्र

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्ला उद्या घेणार अंतराळ झेप; 'Ax-4' मिशनाच्या प्रक्षेपणाबद्दल सर्वकाही वाचा एका क्लिकवर..

Shubhanshu Shukla Latest Update : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची ‘Ax-4’ मोहीम उद्या प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. या खासगी मोहिमेत ते पायलटच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जातील.

Saisimran Ghashi

Shubhanshu Shukla : अखेर अनेक अडथळ्यांनंतर भारतीय वंशाचे इस्रोचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या सहभागातील ‘Ax-4’ या खासगी अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण बुधवार २५ जून रोजी दुपारी १२:०१ वाजता (भारतीय वेळेनुसार) होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिली आहे.

या मोहिमेच्या प्रक्षेपणात सात वेळा विलंब झाला असून, यामागे विविध तांत्रिक अडचणी, खराब हवामान आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (ISS) गळती यांसारखी कारणे होती. सुरुवातीला हे मिशन २९ मे रोजी उड्डाणासाठी निश्चित केले गेले होते. मात्र एकामागोमाग एक अडथळे आल्याने मोहिमेचे वेळापत्रक वारंवार पुढे ढकलावे लागले.

नवीन वेळापत्रकानुसार, ‘Ax-4’ ही खासगी अंतराळ मोहीम नासाच्या फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरमधील लाँच कॉम्प्लेक्स ३९ए वरून ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन-९’ रॉकेटच्या साहाय्याने प्रक्षेपित केली जाणार आहे. या रॉकेटवरून एक नवीन ‘ड्रॅगन’ यान अंतराळात सोडण्यात येईल आणि हे यान पुढे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी गुरुवारी (२६ जून) सायंकाळी ४:३० वाजता (भारतीय वेळेनुसार) जाऊन जोडले जाण्याची अपेक्षा आहे.

सदस्य कोण आहेत?


या ऐतिहासिक मोहिमेत शुभांशु शुक्ला हे 'पायलट' म्हणून भूमिका पार पाडणार आहेत. मोहिमेचे नेतृत्व प्रसिद्ध अंतराळवीर आणि अ‍ॅक्सिऑम स्पेसमधील मानवी अंतराळउड्डाण विभागाच्या संचालिका पेगी व्हिटसन या करत आहेत. त्यांच्यासोबत ESA (युरोपियन स्पेस एजन्सी) कडून पोलंडचे सावोश उझनास्की विनिएवस्की आणि हंगेरीचे तिबोर कपू हे ‘मिशन स्पेशालिस्ट’ म्हणून सहभागी आहेत.

तांत्रिक अडचणींमुळे सात वेळा बदलले वेळापत्रक


या मोहिमेच्या नियोजनात सतत अडथळे आले. सुरुवातीला ८ जूनला होणारे प्रक्षेपण ‘क्रू ड्रॅगन’च्या इलेक्ट्रिकल हार्नेसमधील समस्येमुळे रद्द झाले. त्यानंतर ९ जूनला ‘फाल्कन-९’च्या तांत्रिक तयारीमध्ये उशीर झाल्यामुळे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. १० जून रोजी खराब हवामानामुळे पुन्हा विलंब झाला.
११ आणि १२ जूनला प्री-लाँच चाचण्यांमध्ये ऑक्सिजन गळतीसह काही अन्य त्रुटी आढळल्यामुळे आणखी विलंब झाला. शेवटी २२ जूनला नियोजित असलेले प्रक्षेपण ISSमधील गळतीमुळे पुन्हा पुढे ढकलले गेले.

स्पेसएक्स यान आणि लाँचपॅड पूर्णपणे तयार


स्पेसएक्सचे फाल्कन-९ रॉकेट आणि नवीन ड्रॅगन यान सध्या केनेडी स्पेस सेंटरमधील लाँच कॉम्प्लेक्स ३९ए येथे योग्य स्थितीत ठेवण्यात आले आहेत. या मिशनसाठी सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली असून हवामान आणि अन्य स्थिती अनुकूल राहिल्यास बुधवारच्या दुपारी हा ऐतिहासिक प्रक्षेपण सोहळा पाहायला मिळणार आहे.

भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा क्षण असणार आहे, कारण शुभांशु शुक्ला हे अशा खासगी मिशनमध्ये सहभागी होणारे काही मोजक्या भारतीयांपैकी एक आहेत. ही मोहीम केवळ तंत्रज्ञानाचाच नव्हे, तर जागतिक पातळीवर भारताच्या अंतराळक्षेत्रातील सहभागाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT