Alien Life eSakal
विज्ञान-तंत्र

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

James Webb : जगातील सगळ्यात मोठा स्पेस टेलिस्कोप जेम्स वेब आता या ग्रहाचं सखोल निरीक्षण करणार आहे..

Sudesh

Alien Life James Webb : जेव्हापासून पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांचा शोध लागला आहे, तेव्हापासूनच त्या ग्रहांवर देखील जीवन आहे का याबाबत मानवाला कुतूहल लागून राहिलं आहे. गेल्या कित्येक शतकांपासून एलियन्सचा शोध घेण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झटत आहेत. आता पृथ्वीपासून 124 प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या एका ग्रहावर जीवन असण्याचे संकेत वैज्ञानिकांना मिळाले आहेत. या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आता जेम्स वेब टेलिस्कोपची मदत घेण्यात येणार आहे.

दि टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, हा ग्रह K2-18b या ताऱ्याभोवती परिक्रमा करत आहे. या ग्रहावर देखील पृथ्वीप्रमाणेच महासागर असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. या ग्रहावर डायमिथाइल सल्फाइड (DMS) असल्याचं जेम्स वेब टेलिस्कोपने दिलेल्या डेटावरुन लक्षात येत आहे. हा वायू फक्त सजीवांमधून बाहेर पडतो. त्यामुळे या ग्रहावरील समुद्रात जीवन असल्याचं वैज्ञानिक म्हणत आहेत.

जेम्स वेब करणार निरीक्षण

जगातील सगळ्यात मोठा स्पेस टेलिस्कोप जेम्स वेब आता या ग्रहाचं सखोल निरीक्षण करणार आहे. जरी या ग्रहावर एलियन नसले, तरी सजीवांच्या अस्तित्वाशिवाय DMS वायू कसा तयार होऊ शकतो हेदेखील वैज्ञानिकांना समजू शकतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे संशोधन आपल्या फायद्याचं ठरणार आहे.

किती दूर आहे हा ग्रह

हा ग्रह पृथ्वीपासून तब्बल 124 प्रकाशवर्षे दूर आहे. अगदी नासाच्या व्हॉयजर अंतराळयानाच्या गतीने जरी प्रवास केला, तरी त्या ग्रहापर्यंत पोहोचायला आपल्याला 22 लाख वर्षे लागतील. अर्थात, जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने याचं निरीक्षण करणं तरीही शक्य आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT