Smart Phone Cooling Tips esakal
विज्ञान-तंत्र

Smart Phone Cooling Tips : मोबाईलमधून वाफा यायच्या बाकी आहेत आता? असा करा मोबाईलला थंड

स्मार्टफोन थंड कसा करायचा?

Pooja Karande-Kadam

Smart phone Cooling Tips : स्मार्टफोन वापरणाऱ्यांना अनेकदा फोम हीट होत असल्याची समस्या भेडसावत असते. अनेकांना फोन फुटण्याचीही भीती वाटते. पण अनेकांना फोन हीट का होतो याची माहितीच नसते. हल्ली बऱ्याचदा गेम खेळताना, ब्राऊजिंगदरम्यान, चार्जिंग करताना मोबाईल गरम होतो. मोबाईल थोड्या प्रमाणात गरम होत असेल तर ठीक आहे. मात्र थोड्याशा वापरानेही तो जास्त हीट होत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

ही समस्या काही सोप्या उपायांनीही घालवू शकता. स्मार्टफोन थंड ठिकाणी ठेवले पाहिजेत. काही स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या उत्पादनांसाठी विशेष उपाय देखील देतात जे त्यांना थंड ठेवण्यास मदत करतात. त्यातील काही उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

कोणत्या कारणाने फोनमध्ये हीट निर्माण होते?

जेव्हाही ओव्हरहीटींगची समस्या येते, तेव्हा त्यात प्रोसेसरचा सर्वात मोठा हात असतो. त्यासोबत स्नॅपड्रॅगन ८१० आणि ६१५ हीटिंगसाठी कारणीभूत मानले जातात. पण ओव्हरहीटींगच्या मागे हेच एक कारण नाहीये. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त स्मार्टफोनचा वापर करत असाल, जसे की, मल्टीटास्किंग, हाय-एन्ड गेम्स इत्यादी. तर तुमचा स्मार्टफोन वार्म होणार हे नक्की.

तसेच Li-ion बॅटरीमध्ये हीटींगची समस्या ‘थर्मल रनअवे’ या गोष्टीमुळेही होते. यामुळे फोन हीटींग अधिक जास्त धोकादायक होतं. जर स्मार्टफोन मेटल बॉडीचा असेल तर अधिक हीट निर्माण होते. फोम वार्म होण्याचं आणखी एक कारण म्हणजे फोनमध्ये नेटवर्क बरोबर नसेल किंवा सिग्नल वीक असेल, अशात जर तुम्ही अ‍ॅप्स डाऊनलोड केले तर फोन ओव्हरहीट होतो. 

फोन थंड ठिकाणी ठेवा

स्मार्टफोन थंड आणि कोरड्या जागी ठेवल्यास बॅटरी आणि उपकरणे थंड होतात आणि त्यांच्या बिघाडाचा धोका कमी होतो.

फोन केस किंवा कव्हर वापरा

काही स्मार्टफोन कंपन्या फोनसोबत फोन केस किंवा कव्हर देखील देतात ज्यामुळे त्यांना थंड ठेवण्यास मदत होते.

बॅटरी सेव्हर मोड चालू करा

काही स्मार्टफोनमध्ये बॅटरी सेव्हर मोड देखील असतो ज्यामुळे बॅटरी ची बचत होण्यास मदत होते.

 

बॅटरी लवकर संपते

जेव्हा स्मार्टफोन गरम असतो तेव्हा त्याची बॅटरी लाइफटाइम कमी होते. त्यामुळे फोन थंड जागी ठेवा किंवा चार्ज करताना चालवू नका.

मोबाईल गेम

व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि व्हिडीओ प्लेदरम्यान फोम हीट होतो का? खरंतर ही एक सामान्य बाब आहे. पण जास्तच हीट होत असेल तर तुम्ही एकदा कमी रेज असलेला व्हिडीओ प्ले करुन बघा. कारण हायडेफिनेशनचे व्हिडीओ प्ले करण्याची क्षमता तुमच्या फोनमध्ये नसावी. फोनची इंटरनल मेमरी फुल झाल्यानेही कधी कधी ही समस्या होते. अशावेळी नको असलेल्या फाईल इंटरनल मेमरीमधून डिलीट करा. 

स्मार्टफोन गरम केल्याने बऱ्याच समस्या उद्भवू शकतात

कार्यक्षमता कमी होणे

उष्णतेमुळे फोनची कार्यक्षमता ही कमी होऊ शकते, ज्यामुळे फोन स्लो होतो किंवा योग्य प्रकारे काम करत नाही.

स्क्रीनला धोका

जास्त तापमानामुळे स्मार्टफोनची स्क्रीन खराब होऊ शकते. हे स्क्रॅच आणि इतर नुकसान म्हणून प्रकट होऊ शकते.

तपशीलवार नुकसान

उच्च तापमान स्मार्टफोनच्या अंतर्गत विस्तारास देखील हानी पोहोचवू शकते, ज्यामुळे त्याचे कार्य अस्थिर होऊ शकते.

सिक्युरिटी प्रॉब्लेम

जास्त तापमानामुळे स्मार्टफोनमध्ये सिक्युरिटी प्रॉब्लेम्सही उद्भवू शकतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती जसे की बँक खात्याचा तपशील देखील खराब होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: मोहम्मद सिराजची सुपरमॅनसारखी फिल्डिंग! बाऊंड्रीजवळ एकाच हाताने चेंडू पकडून आडवला सिक्स, पाहा Video

Chhagan Bhujbal : येवल्यातील कांदाप्रक्रिया उद्योगाला चालना; चिंचोडी एमआयडीसी मध्ये ५० एकरवर उभारणार प्रकल्प- मंत्री छगन भुजबळ

Latest Marathi News Live Update : मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार -अभय जगताप

Latur News : गाव अन् आडनाव एकच, कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध; तरुण-तरुणीनं थेट मृत्यूला कवटाळलं

Thane News: परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतीत! भातकापणीवर परिणाम होण्याची भीती; उत्पन्नावरही फटका बसणार

SCROLL FOR NEXT