Smartphone Care Tips esakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Care Tips : स्मार्टफोनच्या बाबतीत या चुका झाल्या तर फोन होईल कायमचा खराब

आजकाल स्मार्टफोन ही एक फारच महत्त्वाची गोष्ट

सकाळ डिजिटल टीम

Smartphone Care Tips : आजकाल स्मार्टफोन ही एक फारच महत्त्वाची गोष्ट बनली आहे. प्रत्येक कामात स्मार्टफोनचा वापर होत असतो. पण याच स्मार्टफोनवर आपण फार अवलंबून असल्याने तो वापरताना आपल्याला अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आपल्या कोणत्याही एका चुकीमुळे स्मार्टफोन खराब होऊन मोठे नुकसान होऊ शकते.

म्हणूनच चुकूनही अनेकदा अशा गोष्टी करू नयेत, ज्याने स्मार्टफोन खराब होईल. त्यात आता उन्हाळा आल्याने सर्वत्र उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दरम्यान हा वाढता उष्मा स्मार्टफोनसाठीही हाणीकारक आहे. दरम्यान अशा या कमालीच्या उकाड्यात आपला स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात तापत असल्याचं दिसून येतं. तो तापल्यामुळे त्याच्यात आणखी अडचणी निर्माण होतात. तर या सगळ्यापासून स्मार्टफोनची काळजी कशी घ्याल याबद्दल जाणून घेऊ...

स्मार्टफोन चार्ज करतानाही काळजी घ्यावी लागते. कारण अतिचार्जमुळेही फोन खराब होऊ शकतो. दरम्यान हेच कारण आहे की जेव्हाही तुम्ही स्मार्टफोन चार्ज करण्यास सुरुवात कराल तेव्हा त्याची विशेष काळजी घ्या. स्मार्टफोनला जास्त वेळ चार्ज करून ठेवल्याने त्याचा मदरबोर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही स्मार्टफोन चार्ज करता तेव्हा त्याचा चार्जिंग कालावधी लक्षात ठेवा.

स्मार्टफोनवर गेम्स खेळताना तुम्हाला फोनची विशेष काळजी घ्यावी लागते. सतत गेमिंग केल्याने तुमचा फोन खराब होऊ शकतो. म्हणूनच फोनवर गेमिंगच्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. सतत गेमिंगचा थेट परिणाम फोनच्या मदरबोर्डवर होतो. तसेच तुम्ही फोनवर कोणता गेम खेळता यावरही ते अवलंबून असते. अधिक हेवी गेम्स अधिक काळ खेळल्याने फोनचं नुकसान होऊ शकतं.

स्मार्टफोन वापरताना, सर्वप्रथम तो आपण आपल्याकडे नसताना इतरवेळी कुठे ठेवतो , ते देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे चार्जला लावताना, झोपताना किंवा इतर कामं करत असताना फोन ओल्या जागी ठेवणं धोक्याचं ठरु शकतं. फोन भिजला तरी फोन खराब होऊ शकतो. कारण ओलाव्यामुळे फोनचा मदरबोर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही फोन वापरता तेव्हा या गोष्टीचीही काळजी घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT