Mobile Charging Tips eSakal
विज्ञान-तंत्र

Mobile Charging Tips : केवळ फोनच नाही, तर चार्जरमध्येही लागू शकते आग; अशी घ्या खबरदारी!

अशा घटना या बहुतांश वेळी केवळ निष्काळजीपणामुळे घडतात.

Sudesh

सोशल मीडियावर स्मार्टफोनला आग लागल्याचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशा दुर्घटनांमध्ये काही जणांचा दुर्दैवी बळी देखील गेला आहे. स्मार्टफोनसोबतच त्याच्या चार्जरमध्येही आग लागण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

स्मार्टफोन किंवा चार्जरमध्ये आग लागण्याच्या घटना या बहुतांश वेळा निष्काळजीपणामुळे घडतात. त्यामुळेच, स्मार्टफोन आणि चार्जरचा योग्य पद्धतीने वापर करणं आवश्यक आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

चुकीचा चार्जर

कित्येक लोक आपला फोन चार्ज करण्यासाठी कोणत्याही चार्जर किंवा वायरचा वापर करतात. मात्र, ही गोष्ट तुमच्या स्मार्टफोनसाठी घातक ठरू शकते. अगदी स्फोट झाला नाही, तरी चुकीचा चार्जर वापरल्याने तुमच्या फोनची बॅटरी डॅमेज नक्कीच होऊ शकते. (Mobile Tips)

चार्जिंगवेळी फोन वापरणं

चार्जिंग सुरू असताना फोन वापरण्याची चूक तर कित्येक लोक करतात. मात्र, मोबाईल कंपन्या वारंवार असं न करण्याचे आवाहन करत असतात. लोक फोन चार्जिंगला लाऊन गेमिंग, व्हिडिओ पाहणे किंवा फोनवर बोलणे अशा गोष्टी करतात. चार्जिंग सुरू असताना फोन अत्यंत गरम झालेला असतो, त्यामुळे अशा वेळी फोन वापरणं धोक्याचं ठरतं.

बॅटरीकडे दुर्लक्ष

कित्येक यूजर्स स्मार्टफोनच्या बॅटरीकडे दुर्लक्ष करतात. स्मार्टफोनची बॅटरी खराब झाल्यानंतर काही वेळा फुगू शकते. अशा फुगलेल्या बॅटरीसह फोन वापरणं धोक्याचं ठरू शकतं. स्मार्टफोनची बॅटरी फुगल्यास फोन किंवा बॅटरी बदलून घ्यावं.

चार्जिंगची जागा

तुम्ही फोन कुठे चार्ज करता हेदेखील खूप महत्त्वाचं ठरतं. चार्जिंग होत असताना फोन आधीच गरम होत असतो. त्यामुळे, अशा ठिकाणी फोन आजिबात चार्जिंगला लाऊ नये, जिथे त्याला आणखी हीट मिळेल. तसंच फोन चार्जिंगला लावून उशी किंवा बेडवर ठेऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT