realme c31 
विज्ञान-तंत्र

स्वस्तात मस्त! 8 हजारांपेक्षा कमीत मिळतात हे तीन स्मर्टफोन; पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर सवलतीत वेगवेगळे स्मार्टफोन विकले जात आहेत. बरेच ग्राहक ऑनलाईन बजेट स्मार्टफोनच्या शोधात असतात, तुम्ही देखील बाजारात 8000 रुपयांच्या रेंजमधील फोन शोधत असाल तर असे अनेक फोन बाजारात उपलब्ध आहेत. येथे आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर 8000 रुपयांपर्यंत स्वस्त असलेल्या 3 बेस्ट स्मार्टफोनबद्दल सांगत आहोत. यामध्ये 3 रियर कॅमेरे, 5000 mAh बॅटरी आणि 32 GB स्टोरेज सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.

1. POCO C31

हा ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांसह येणारा 8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन आहे. त्याच्या 3 GB RAM + 32 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.53 इंच HD + डिस्प्ले, 13MP + 2MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि MediaTek Helio G35 प्रोसेसर दिले आहे.

2. Realme Narzo 50i

हा स्टाईलीश दिसणारा स्मार्टफोन तुम्ही Flipkart वरून 7,549 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या 2 GB RAM + 32 GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 6.5 इंच डिस्प्ले, 8MP रिअर कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि SC9863A प्रोसेसर यामध्ये उपलब्ध आहे.

3. Infinix Smart 5

या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात 6000mAh ची मोठी बॅटरी आहे. फोनच्या 2 GB RAM + 32 GB स्टोरेज मॉडेलसाठी 7,499. फोनमध्ये तुम्हाला 6.82 इंच एचडी + डिस्प्ले, 13MP + लो लाइट सेन्सरसह रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि MediaTek Helio G25 प्रोसेसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: इंग्लंडमध्ये कसोटीतही वैभवची बॅट तळपली; गोलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर ठोकलं वादळी अर्धशतक

Nashik News : ‘दादा’, ‘भाऊ’ची नंबरप्लेट आता महागात; ८१४ वाहनांवर कारवाई

VIRAL VIDEO: 'डॉक्टर, हा साप मला चावला!' चावलेल्या सापाला घेऊन काका पोहचला रुग्णालयात, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Nashik Crime : चार कोटीच्या विम्यासाठी दोन खून, साडेतीन वर्षांनंतर आरोपी जेरबंद

Thane News: मुसळधार पावसात बसून डोंबिवलीकरांचे आंदोलन, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT