Parkinson's Smartwatch eSakal
विज्ञान-तंत्र

Parkinson's : स्मार्टवॉच ठरणार वरदान! लक्षणे दिसण्याच्या सात वर्षांपूर्वीच मिळणार पार्किन्सनचे संकेत; अभ्यासात माहिती समोर

यूकेच्या डिमेन्शिया रिसर्च इन्स्टिट्यूटने याबाबत माहिती दिली आहे.

Sudesh

पार्किन्सन या आजारावर वेळीच उपचार करणं आता शक्य होणार आहे. यासाठी तुमची स्मार्टवॉचच उपयोगी ठरणार आहे. यूकेच्या डिमेन्शिया रिसर्च इन्स्टिट्यूटने याबाबत माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी तब्बल १ लाखांहून अधिक स्मार्टवॉचचा डेटा तपासण्यात आला होता.

कार्डिफ युनिवर्सिटीमध्ये झालेल्या एका परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. यासाठी संशोधकांनी यूके बायोबँकमधील डेटा वापरला. यामध्ये सुमारे ५० लाख व्यक्तींचा आरोग्यासंबंधी डेटा रेकॉर्ड केला जातो. या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला. डॉ. कॅथरीन पेअल यांनी याबाबत बीबीसीला माहिती दिली. (Parkinson's Symptoms)

यासाठी २०१३ ते २०१६ या कालावधीतील १,०३,७१२ स्मार्टवॉच यूजर्सचा डेटा तपासण्यात आला. त्यांच्या केवळ एक आठवड्यातील डेटाचं विश्लेषण करून त्यातील किती व्यक्तींना पुढे जाऊन पार्किन्सन होऊ शकतो याबाबत बरोबर अंदाज लावता आला. अर्थात, यासाठी जगभरातील इतर भागांमध्ये अभ्यास होणं गरजेचं असल्याचं मत संशोधकांनी व्यक्त केलं. जर सगळीकडे समान परिणाम दिसून आले, तर पार्किन्सन ओळखण्यासाठी स्मार्टवॉच नक्कीच फायदेशीर ठरू शकते, असंही ते म्हणाले.

उशीरा होतं निदान

पार्किन्सनच्या लक्षणांमध्ये शारीरिक हालचाली मंद होणे, हात-पाय कापणे, चालताना गती मंदावणे, कमी ऐकू येणे, गोंधळ उडणे अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. कित्येक वेळा या लक्षणांकडे उतार वयातील साधारण बाब समजून दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे या आजाराचं निदान होण्यास भरपूर उशीर होतो.

परवडणारा पर्याय

या रिसर्च टीममधील आणखी एक संशोधक डॉ. सिंथिया सँडॉर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या, "केवळ एका आठवड्याचा डेटा पाहून लक्षणे दिसण्याच्या सुमारे सात वर्षांपूर्वीच याबाबत माहिती मिळू शकते. त्यामुळे वेळीच उपचार सुरू होऊ शकतात. यूकेमधील सुमारे ३० टक्के लोक स्मार्टवॉच वापरतात. अशा व्यक्तींना पार्किन्सन ओळखण्यासाठी एक विश्वासार्ह आणि परवडणारा पर्याय यामुळे उपलब्ध होऊ शकतो."

भारतातील नागरिकांना फायदा

या रिसर्चमुळे भारतातील नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे. एका रिसर्चनुसार भारतात पार्किन्सनचे सुमारे १० लाख रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, देशातील तरुणांमध्येही याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : समरजीतसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश?

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT