Smart Phone
Smart Phone  Sakal
विज्ञान-तंत्र

Smart Phone : सोशल मीडियाच्या व्यसनापासून होणार सुटका; जाणून घ्या कसं?

सकाळ डिजिटल टीम

One Sec App : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असून, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांचा वेळ हा मोबाईलवरच जातो.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सततच्या वापरामुळे अनेकजण याच्या आहारी गेले आहे. अनेकजण दिवसातील बहूमुल्य वेळ सोशल मीडियावर घालवत आहे. त्यात लॉक डाऊनमध्ये सर्व काही बंद असल्याने अनेकजण वेळ जावा यासाठी मोबाईल आणि सोशल मीडियावर सक्रीय होते. मात्र, याचा परिणाम अनेकांना सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. मात्र, आता तुमच्यापैकी अनेकांना लागलेले हे व्यसन सोडवले जाऊ शकते.

जर्मनीचा रहिवासी फ्रेडरिक रिडेल सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू लागला होता. सोशल मीडियाला इतका वेळ देण्यामागे कोरोना लॉकडाऊन हे कारण होते. मात्र, कालांतराने रिडेलला याचे व्यसन लागले. ते सोडवण्यासाठी रिडेलने अनेक प्रयत्नदेखील केले. मात्र, काही करूनदेखील तो यावर नियंत्रण मिळवू शकला नाही.

स्वतः बनवले अ‍ॅप

रिडेल स्वतः अ‍ॅप डेव्हलपर असून, इतरांप्रमाणे मीदेखील सोशल मीडियाच्या आहारी गेले होतो. त्यामुळेच मी या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच 'वन सेक' अ‍ॅप तयार केल्याचे रिडेल सांगतो.

हे अ‍ॅप सोशल मीडिया आयकॉनवर बोट ठेवल्यावर अ‍ॅक्टिव होते. त्यानंतर साधारण १० सेकंदांची वाट पाहावी लागते. यामुळे अनेकजण कंटाळून मोबाईल बाजूला ठेवतात. हे अ‍ॅप वापरल्यानंतर सोशल मीडिया वापरण्याचे व्यसन कमी झाल्याचे रिडेल म्हणाला.

2020 च्या उत्तरार्धात, रिडेलने Apple च्या App Store वर One Sec अ‍ॅप अपलोड केले. सध्या हे अ‍ॅप केवळ आयफोन यूजर्ससाठी उपलब्ध असून, अँड्रॉइड व्हर्जनवरसाठी काम सुरू आहे. आतापर्यंत हे अ‍ॅप अडीच लाखांहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT