Afeela Sakal
विज्ञान-तंत्र

Electric Car: मस्कच्या Tesla चे धाबे दणाणार, Sony-Honda ने सादर केली भन्नाट फीचर्ससह येणारी कार

Sony आणि Honda या दोन कंपन्यांनी मिळून नवीन इलेक्ट्रिक कार ब्रँडची घोषणा केली आहे. CES मध्ये या कंपन्यांनी Afeela या इलेक्ट्रिक कार ब्रँडची घोषणा केली.

सकाळ डिजिटल टीम

Sony-Honda EV Brand: अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक कार लाँच करण्यावर भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता Sony आणि Honda या दोन कंपन्यांनी मिळून नवीन इलेक्ट्रिक कार ब्रँडची घोषणा केली आहे. कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो (CES) मध्ये या कंपन्यांनी Afeela या इलेक्ट्रिक कार ब्रँडची घोषणा केलीये. वर्ष २०२६ मध्ये कंपनीची कार उत्तर अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

नवीन ब्रँडबाबत अद्याप जास्त माहिती देण्यात आलेली नाही. सोनी होंडा मोबिलिटीचे सीईओ यासुहाइड मिजुना म्हणाले की, कार आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि सोनीच्या आधुनिक टेक्नोलॉजीसह येईल.

Afeela ब्रँडच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये कॅमेरा, रडार, अल्ट्रासोनिकसह ४० पेक्षा अधिक सेंसर मिळेल. हे सेंसर वाहनाच्या बाहेरील बाजूला असतील व यामुळे सेल्फ ड्राइव्हिंग दरम्यान मदत होईल.

सोनीने तीन वर्षांपूर्वी कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये अशाच प्रकारच्या कॉन्सेप्ट कारला सादर केले होते. मात्र, ही एक सेडान कार आहे, ज्याच्या पुढील बाजूला एक लाइट बार, एक बंद ग्रिल आणि एक हाय-ग्लास ब्लॅक रुफ देण्यात आले आहे. ब्लॅक हबकॅप्स आणि व्हीलच्या वरील बाजूला एक लाइट एक्सेंट देखील आहे.

हेही वाचा: ChatGPT vs Satya Nadella: 'बिर्याणी'वरून सत्या नडेला ChatGPT ला नडले, पाहा नक्की काय घडलं

Afeela ब्रँड अंतर्गत येणाऱ्या या इलेक्ट्रिक कारची किंमत मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, वोल्वो आणि ऑडी सारख्या प्रीमियम कार एवढी असण्याची शक्यता आहे. सोनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या गाडीला सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शन सेवेसह सादर केले जाईल. सबस्क्रिप्शन घेतल्यास यूजर्सला काही सुविधांचा फायदा मिळेल.

दरम्यान, Sony ने तीन वर्षांपूर्वी CES मध्ये Vision-S या कॉन्सेप्ट सेडान कारला सादर केले होते. आता सोनी आणि होंडा एकत्र येऊन अफिला ब्रँड अंतर्गत इलेक्ट्रिक कारला लाँच करणार आहेत. लाँचिंगनंतर ही कार थेट टेस्लाला टक्कर देईल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT