Mahindra Scorpio  Google
विज्ञान-तंत्र

महिंद्राची कार खरेदीचा विचार करताय? कंपनी देतेय 'या' खास ऑफर

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (SUV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Mahindra कंपनी तुम्हाला खास ऑफर देत आहे. देशातील प्रसिद्ध ऑटो कंपनी Mahindra & Mahindra आपल्या काही खास SUV च्या खरेदीवर लोकांना मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या सवलतींचा लाभ तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत घेऊ शकता.

Mahindra Alturas G4 आणि XUV300 वर मिळतोय डिस्काऊंट

रिपोर्टनुसार, कंपनीच्या XUV300 सबकॉम्पॅक्ट SUV वर 49,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4,500 रुपयांची कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 5000 रुपयांपर्यंतच्या इतर ऑफर आहेत. यामध्ये 15,000 रुपयांपर्यंतच्या कॅश ऑफरचाही समावेश आहे. Mahindra Alturas G4 वर Rs 81,500 पर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 11,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर आणि 20,000 रुपयांपर्यंतच्या इतर ऑफरचा समावेश आहे.

Mahindra Marazzo आणि Bolero वर ऑफर

महिंद्रा कंपनीची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही बोलेरोवरही 13 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे. Mahindra Marazzo वर 40,200 रुपयांपर्यंत सूट दिली जात असून नोव्हेंबरमध्ये या MPV वर ग्राहकांना 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट्स, 20 हजार रुपयांपर्यंत कॅश डिसकाऊंट आणि 5200 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर मिळू शकतात.

Mahindra KUV100 NXT आणि Scorpio वर देखील विशेष डिसकाऊंट

कंपनी आपल्या Mahindra Scorpio वर 32,320 पर्यंत सूट देत आहे. यामध्ये 4,000 रुपयांपर्यंतच्या कॉर्पोरेट ऑफर, 13,320 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त ऑफर आणि 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंजचे बेनिफिट्स दिले जात आहेत. दुसरीकडे, Mahindra KUV100 NXT वर एकूण 61,055 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 3 हजार रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट ऑफर आणि 38,055 रुपयांपर्यंत कॅश सवलत दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: सुरुवातीच्या कलांनी वाढवली उत्सुकता, राज्यात पुन्हा सत्ता कोणाच्या हातात जाणार?

Kapileshwar Tank Wall Collapse : कपिलतीर्थ तलावाची भिंत कोसळून दोन निष्पाप मुलांचा बुडून दुर्दैवी अंत; कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटणारा

Sunetra Pawar Baramati Bypoll : अजितदादांच्यानंतर सुनेत्राताईंची जबाबदारी! अजित पवारांचे आतापर्यंतचा विक्रम सुनेत्रा पवार मोडणार, “मॅजिक फिगर” गाठणार

Nagpur Crime : नायब तहसीलदाराने जीवन संपवले, राहत्या घरी घेतला गळफास, धक्कादायक कारण समोर

Kolhapur crime news : डॉक्टर महिला घरात एकटी, ओळखीच्या तरूणाकडून बलात्कार; मोबाईलवर शूट करून दिली धमकी, कोल्हापुरात धक्कादायक घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT