SRK Luxury Car esakal
विज्ञान-तंत्र

SRK Luxury Car : किंग खाननं घेतली एवढ्या कोटींची शानदार कार, खासियत बघून व्हाल हैराण

ल्स रॉयसच्या या लक्झरी एसयूव्हीची किंमत 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. चला तर जाणून घेऊया या कारची खासियत

साक्षी राऊत

SRK Luxury Car : पठाण चित्रपटाच्या यशानंतर किंग खान सगळीकडे चर्चेत आहे. भारतीय सेलिब्रिटींमध्ये त्याचा स्तर आणखी उंचावलाय. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरही पठाणची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. दरम्यान, बातमी येत आहे की, शाहरुख खान जो त्याचा पुढचा चित्रपट जवानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्याने रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज सारखी खास एसयूव्ही खरेदी केली आहे. रोल्स रॉयसच्या या लक्झरी एसयूव्हीची किंमत 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. चला तर जाणून घेऊया या कारची खासियत.

महागडी SUV

अलीकडेच, बेंगळुरूमधील एका ब्लॉगरने YouTube वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शाहरुख खानच्या नवीन रोल्स रॉयस कुलिनन ब्लॅक बॅज लक्झरी SUV ची झलक दिसत आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत 8.2 कोटी रुपये आहे, ऑन-रोड पोहोचेपर्यंत तिची किंमत 9 कोटींहून अधिक झाली असेल आणि कस्टमायझेशन केल्यानंतर त्याची किंमत 10 कोटी रुपये होईल. Rolls-Royce च्या या लक्झरी SUV मध्ये बरेच कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध आहेत. शाहरुख खानकडे पांढऱ्या रंगाची रोल्स रॉयस कुलीनन ब्लॅक बॅज आहे.

पावर विथ लक्झरी कार

Rolls-Royce Cullinan Black Badge 6.75-litre V12 पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 571 hp पॉवर आणि 850 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या लक्झरी एसयूव्हीमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. लूक आणि फीचर्स तसेच कम्फर्ट आणि लक्झरीच्या बाबतीत रोल्स रॉइसच्या या एसयूव्हीची कोणाशी स्पर्धाच होऊ शकत नाही. Cullinan Black Badge चे आतील भाग इतके आलिशान आहेत की ते पाहून तुम्हाला ती अगदी रॉयल लूक देते. (Automobile)

भारतातील श्रीमंतांमध्ये रोल्स रॉइस लक्झरी सेडान (Luxury Cars) आणि एसयूव्हीची जबरदस्त क्रेझ आहे. सर्व लोकप्रिय सेलिब्रिटींच्या गॅरेजमध्ये रोल्स रॉयसचे एक किंवा दुसरे मॉडेल आहेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025: हत्तींचं स्थलांतर, बिबट्यांची दहशत अन् कुत्र्यांचा वाद… 'हे' वर्ष वन्यजीवांसाठी इतकं हादरवणारं का ठरलं?

Railway News: रेल्वेमध्ये पॉइंट्समन, गेटमन, ट्रॅकमनची कमतरता...; माजी सैनिक मैदानात उतरणार, प्रशासनाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update: अॅडव्होकेट प्रशांत पाटील यांनी बारामती सत्र न्यायालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने लावली हजेरी

Thane Water Supply: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुन्हा जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान, ५० टक्के पाणीकपात; कधीपर्यंत? जाणून घ्या...

Kolhapur Youth Addiction : ब्रेडला बाम, रुमालात व्हाईटनर अन् स्नेक बाईटपर्यंत मजल; ग्रामीण तरुणाई नशेच्या गर्तेत

SCROLL FOR NEXT