Sanchar Saathi Portal Stolen Lost Mobile Phone esakal
विज्ञान-तंत्र

Sanchar Saathi : हरवलेले अन् चोरी झालेले मोबाईल कुरियरने येतायत घरी; नेमका विषय काय? बघा एका क्लिकवर..

Sanchar Saathi Portal Stolen Lost Mobile Phone : हरवलेले किंवा चोरी गेलेले मोबाईल संचार साथी पोर्टलच्या मदतीने परत मिळू लागले आहेत. ही नेमकी काय प्रक्रिया आहे जाणून घेऊया

Saisimran Ghashi

स्मार्टफोन हरवला की तो परत मिळेल अशी आशा अनेकदा राहत नाही. मात्र आता हे चित्र बदलत आहे. केंद्र सरकारच्या नव्या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना त्यांचे वर्ष दोन वर्षांपूर्वी हरवलेले स्मार्टफोन पुन्हा कुरिअरद्वारे परत मिळत आहेत. हे शक्य झाले आहे ‘संचार साथी’ पोर्टलमुळे, ज्यात ‘Central Equipment Identity Register (CEIR)’ नावाची एक विशेष प्रणाली आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक त्यांचा हरवलेला किंवा चोरी गेलेला स्मार्टफोन ऑनलाईन पोर्टलवर सहज नोंदवू शकतात. पोर्टलवर तक्रार दाखल होताच संबंधित मोबाईलचा IMEI नंबर ब्लॉक केला जातो. यामुळे तो फोन कोणत्याही नेटवर्कवर चालू करता येत नाही आणि त्यामुळे त्याची विक्री किंवा वापर करणे अशक्य होते. हे तंत्रज्ञान मोबाईल ट्रॅक करण्यासाठीही सक्षम आहे, ज्यामुळे पोलिसांना हरवलेले मोबाईल शोधण्यात मोठी मदत होते.

गाझियाबाद पोलिसांनी नुकतेच जाहीर केले की त्यांनी अशा पद्धतीने तब्बल १२०० हरवलेले स्मार्टफोन परत मिळवले आहेत आणि देशभरातील संबंधित मालकांना ते कुरिअरद्वारे पाठवले आहेत. विशेष म्हणजे हे मोबाईल दोन तीन वर्षांपूर्वी हरवले होते.

हरवलेला स्मार्टफोन रिपोर्ट करण्यासाठी काय कराल?

जर तुमचाही मोबाईल हरवला असेल, तर तुम्ही खालील पद्धतीने तक्रार दाखल करू शकता

  1. गुगलवर "Sanchar Saathi Portal" असे शोधा किंवा थेट sancharsaathi.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

  2. 'Citizen Centric Services' विभागात ‘Block Your Lost/Stolen Mobile Handset’ या पर्यायावर क्लिक करा.

  3. त्यानंतर ‘Block lost/stolen mobile handset’ हे निवडा.

  4. सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि हरवलेल्या फोनचा IMEI नंबर टाका.

  5. आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचा फोन शोधला गेला तर तो तुमच्यापर्यंत कुरिअरने पाठवण्यात येतो.

दरम्यान २०२५च्या CII वार्षिक बिझनेस समिटमध्ये दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की भारत येत्या पाच वर्षांत जगातील डेटा केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. भारताची ‘डिजिटल फर्स्ट’ अर्थव्यवस्था ही दूरसंचार क्षेत्रातील मोठ्या बदलांमुळे शक्य झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांचा तंत्रज्ञानावर विश्वास वाढत आहे आणि हरवलेले फोन परत मिळण्याची शक्यता आता अधिक व्यवहार्य झाली आहे. मोबाईल हरवला की पोलिस ठाण्याची पायपीट करण्यापेक्षा आता फक्त काही क्लिकमध्ये तो पुन्हा मिळवणे शक्य झाले आहे हेच या योजनेचे यश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अवादा कंपनीच्या विरोधात उपोषण; उपोषणकर्त्याच्या आईचे निधन, मृतदेह आंदोलनस्थळी, प्रशासनाची धावपळ, तहसीलदारांचे आश्वासन

26 July Flood: वीस वर्षांपूर्वीची 'ती' काळी रात्र : महाडजवळील दरडीत गाडले गेले होते 150 जीव, विलासरावांनी उभा केलेला मदतीचा डोंगर

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! ६ महिने रेशन न घेतल्यास आता कायमचेच रेशनधान्य बंद; प्रत्येक सहा महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून येणार यादी

No Bread High-Protein Sandwich: वीकेंडला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हवाय? मग ही नो-ब्रेड ‘मूग डाळ सँडविच’ रेसिपी तुमच्यासाठीच

आजचे राशिभविष्य - 26 जुलै 2025

SCROLL FOR NEXT