twitter  
विज्ञान-तंत्र

खुशखबर! आता Twitter वर करा टिव-टिव आणि कमवा भरघोस पैसे; येणार हे नवीन फिचर 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : Twitter म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात मोठमोठे सेलिब्रिटीज, राजकारणी आणि काही नामवंत लोकं.  Twitterवर या सर्वांना आपण फॉलो करत असतो. त्यांचे विचार, त्यांची मतं हे लोक परखडपणे मांडत असतात. म्हणूनच Twitter सुद्धा अनेक नवनवीन फिचर आपल्या यूजर्ससाठी आणत असतं. आता Twitterनं अजून एक भन्नाट फिचर आपल्या यूजर्ससाठी आणलं आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकणार आहात. कसे ? फीचरबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.      

आता Twitterनं आपल्या यूजर्ससाठी एक नवीन आणि खास फिचर आणलं आहे. या नवीन फीचरमुळे यूजर्स पैसे कमावू शकणार आहेत.  यूजर्स आपल्या फॉलोअर्सच्या माध्यमातून कमाई करू शकणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, Twitter वर तुम्हाला लवकरच काही मोठे बदल बघायला मिळणार आहेत. यामध्ये एक सुपर फॉलो पेमेंट फिचर येणार आहे. याचा उपयोग यूजर्स आपल्या फॉलोअर्सना काही विशेष कन्टेन्ट दाखवण्यासाठी करू शकणार आहेत. ज्यासाठी त्यांच्या फॉलोअर्सकडून त्यांना पैसे मिळू शकणार आहेत. यात बोनस ​ट्वीट, न्यूजलेटरची मेंबरशिप आणि कम्युनिटी ग्रुप यांसारख्या सुविधा शामिल आहेत.  

या अहवालानुसार, Twitter ज्या यूजर्सचे लाखो आणि शेकडो फॉलोअर्स आहेत त्यांना या फीचरचा लाभ घेणार येणार आहे. जर तुम्ही टाकलेली कुठली विशेष पोट पोस्ट तुमच्या फॉलोअर्सना आवडली किंवा ती पोस्ट तुमच्याकडेच असेल तर तुम्ही त्यासाठी तुमच्या फॉलोअर्सकडून पैसे घेऊ शकता. यासाठी तुम्ही एका पोस्ट मागे तब्बल ३६४ रुपयांपर्यंत चार्ज करू शकणार आहात. म्हणजेच जर तुमच्या फॉलोअर्सना तुम्ही टाकलेला विशेष मेसेजे किंवा पोस्ट बघायची असेल तर त्यांना दर महिन्याला तुम्हाला ३६४ रुपये द्यावे लागतील. 

विशेष म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या पैशातून काही पैसे हे Twitter ला तुम्हाला द्यावे लागणार आहेत. मात्र ते पैसे किती असतील याबाबतचा खुलासा अजून कंपनीनं केला नाहीये. मात्र लाखो शेकडो फॉलोअर्स असलेल्या यूजर्सना ही पैसे कमावण्याची अनोखी संधी असणार आहे यात शंका नाही.  

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT