Swiggy Delivery in Train eSakal
विज्ञान-तंत्र

Swiggy in Train : आता रेल्वेमध्ये मागवता येणार स्विग्गीवरुन जेवण; कंपनीचा IRCTC सोबत करार..

Swiggy-IRCTC : येत्या काळात टप्प्या-टप्प्याने ही सुविधा देशभरातील रेल्वे स्थानकांवर सुरू करणार असल्याचं स्विग्गीने स्पष्ट केलं.

Sudesh

Swiggy partnership with IRCTC : भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. काही तासांपेक्षा अधिक मोठा प्रवास असेल, तर रेल्वेमध्ये खाण्याचा प्रश्न येतोच. रेल्वेमध्ये मिळणारे पदार्थ सर्वांना आवडतीलच असं नाही. त्यामुळे रेल्वेमध्ये चांगलं जेवण मिळणं ही एक मोठी समस्या होऊन बसते. यावरच आता स्विग्गीने एक उपाय उपलब्ध केला आहे.

स्विग्गी या फूड डिलिव्हरी करणाऱ्या अ‍ॅपने IRCTC सोबत करार केला आहे. यामुळे आता रेल्वेत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना देखील आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमधून आवडते पदार्थ थेट सीटपर्यंत ऑर्डर करता येणार आहेत. (Swiggy food delivery in Train)

अशी करता येईल ऑर्डर

जेवण ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला IRCTC e-catering पोर्टलवर जावं लागेल. याठिकाणी तुमचा PNR नंबर एंटर करावा लागेल. यानंतर तुमच्यासमोर विविध रेस्टॉरंट्सचा पर्याय दिसेल. यापैकी तुम्हाला हवं ते हॉटेल आणि हवी ती डिश सिलेक्ट करून तुम्ही जेवण मागवू शकता. विशेष म्हणजे पेमेंटसाठी तुमच्याकडे ऑनलाईन आणि कॅश ऑन डिलिव्हरी असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. (How to order online food in train)

चार स्थानकांवर उपलब्ध

ही सुविधा सध्या देशातील केवळ चारच रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बंगळुरू, भुवनेश्वर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम या स्थानकांचा समावेश आहे. येत्या काळात टप्प्या-टप्प्याने ही सुविधा इतर रेल्वे स्थानकांवर देखील सुरू करणार असल्याचं स्विग्गीने स्पष्ट केलं. (Swiggy in-train delivery)

झोमॅटोसोबत आधीच करार

ऑनलाईन फूड डिलिव्हरी पार्टनरसोबत करार करण्याची IRCTC ची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने Zomato सोबत देखील असाच करार केला होता. देशातील कित्येक रेल्वे स्थानकांवर झोमॅटो देखील फूड डिलिव्हरी देत आहे. (Zomato delivery in Railway)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT