Tata-Motors
Tata-Motors 
विज्ञान-तंत्र

टाटा मोटर्सची वाहने महागणार; १ तारखेपासून किंमतीत होणार 'इतकी' वाढ

सकाळ डिजिटल टीम

Tata Motors Price Hike: ऑटोमोबाईल कंपन्या पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. टाटा समूहाची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ने दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती २.५ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. टाटा मोटर्सची ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे.

टाटा मोटर्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, निर्मिती खर्चात झालेली वाढ यामुळे कंपनीने किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्टीलचे दर वाढले आहेत. यासोबतच कच्च्या मालाचे दरही वाढले आहेत.व्यावसायिक वाहनांमध्ये (CV) २-२.५ टक्के वाढ होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत इतर ऑटोमोबाईल कंपन्याही किमती वाढवू शकतात.

जानेवारीत किमती वाढवल्या

यापूर्वी टाटा मोटर्सने १ जानेवारीपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती २.५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. वस्तूंच्या किमती वाढल्याने आणि कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने कंपनीने त्यावेळीही दर वाढवले ​​होते. याशिवाय जानेवारी २०२२ मध्ये मारुती, ऑडी, मर्सिडीजसह इतर कंपन्यांनीही किमती वाढवल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT