TATA Nexon 2023 Facelift eSakal
विज्ञान-तंत्र

TATA Nexon 2023 : टाटाच्या नेक्सॉन आणि नेक्सॉन ईव्हीचं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Nexon EV Facelift : नेक्सॉनच्या इलेक्ट्रिक फेसलिफ्ट मॉडेलची किंमत 14.74 लाखांपासून सुरू होत आहे.

Sudesh

टाटाने आपल्या नेक्सॉन या गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे. यासोबतच नेक्सॉन ईव्ही कारचं नवीन फेसलिफ्ट व्हर्जनही आज (14 सप्टेंबर) लाँच करण्यात आलं. या दोन्ही गाड्यांना अगदी फ्युचरिस्टिक लुक देण्यात आला आहे.

नेक्सॉन फेसलिफ्ट व्हर्जन्स

Tata Nexon Facelift 2023 हे मॉडेल कंपनीने लाँच केलं आहे. या नवीन मॉडेलचे तब्बल 11 व्हेरियंट सादर करण्यात आले आहेत. यातील बेसिक व्हेरियंटची किंमत 8 लाखांपासून सुरू होत आहे. तर Tata Nexon EV Facelift च्या बेस व्हेरियंटची किंमत 14.74 लाखांपासून सुरू होत आहे.

Tata Nexon 2023

टाटा नेक्सॉनचे स्मार्ट, स्मार्ट+, स्मार्ट+ (एस), प्युअर+, प्युअर+ (एस), क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह+, क्रिएटिव्ह+ (एस), फिअरलेस, फिअरलेस+, फिअरलेस+ (एस) असे 11 व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यासोबतच नव्या नेक्सॉनला काही अन्य रंगांमध्ये देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे. यात फिअरलेस पर्पल, क्रिएटिव्ह ओशन, प्रिस्टिन व्हाईट, प्युअर ग्रे, डेटोना ग्रे आणि प्लेम रेड अशा रंगांचा समावेश आहे.

Tata Nexon 2023 Price Range

नेक्सॉनच्या स्मार्ट व्हेरियंटची किंमत 8.10 लाख रुपये आहे. याप्रमाणे स्मार्ट+ (9.10 लाख), प्युअर (9.70 लाख), क्रिएटिव्ह (11 लाख), क्रिएटिव्ह+ (11.70 लाख), फिअरलेस (12.50 लाख), फिअरलेस+ (13 लाख) अशा व्हेरियंट नुसार किंमती आहेत. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.

नवीन फीचर्स

टाटा नेक्सॉनच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये नवीन 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आली आहे. सोबत, एवढंच मोठं डिजिटल इन्स्ट्रिुमेंट क्लस्टर, व्हॉईस ऑपरेटेड इलेक्ट्रिक सनरूफ असे फीचर्सही दिले आहेत.

नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट

टाटाने यावेळी नेक्सॉन इलेक्ट्रिक गाडीचं फेसलिफ्ट मॉडेलही लाँच केलं होतं. यामध्ये देखील नवीन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यामध्ये फ्लेम रेड, प्रिस्टीन व्हाईट, इंटेन्सी टील, इम्पॉवर्ड ऑक्साईड, क्रिएटिव्ह ओशन, डेटोना ग्रे आणि फिअरलेस पर्पल या रंगांचा समावेश आहे.

टाटा नेक्सॉन ईव्हीचे क्रिएटिव्ह+, फिअरलेस, फिअरलेस+, फिअरलेस+ (एस), इम्पॉवर्ड आणि इम्पॉवर्ड+ असे व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील क्रिएटिव्ह+ व्हेरियंटची किंमत 14.74 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे, तर इम्पॉवर्ड+ व्हेरियंटची किंमत 19.94 लाख रुपये (एक्स शोरूम) असणार आहे.

Nexon EV Facelift Price

हायटेक फीचर्स

ईव्ही फेसलिफ्टमध्ये नवीन टच-स्क्रीन सेटअप आणि टू-स्पोक स्टिअरिंग व्हील देण्यात आलं आहे. यामध्ये डॅशबोर्डवर कमी बटण दिले आहेत, ज्यामुळे हायटेक लुक येतो. या कारच्या सेंटर कंन्सोलमध्ये रोटरी ड्रायव्हिंग मोड सिलेक्टर दिला आहे. ड्रायव्हिंग मोड निवडण्यासाठी रेडिओच्या बटणाप्रमाणे तुम्ही याला फिरवू शकणार आहात. यातील इन्फोटेन्मेंट सिस्टीमला 12.3 इंच स्र्कीन दिली आहे, जी ICE मॉडेलच्या तुलनेत मोठी आहे.

नेक्सॉन फेसलिफ्ट मॉडेलमध्ये 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, वायरलेस मोबाईल चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर असे फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी यात 6 एअरबॅग्स, ईएससी सर्व सीट्ससाठी थ्री-पॉइंट सीटबेल्ट, आयएसओफिक्स आणि इमर्जन्सी ब्रेकडाऊन कॉल असिस्टंट फीचरही यात देण्यात आलं आहे.

बॅटरी आणि रेंज

या कारचे मिड रेंज आणि लाँग रेंज असे व्हर्जन लाँच करण्यात आले आहेत. मिड रेंज व्हर्जनची रेंज 325 किलोमीटर एवढी आहे. तर लाँग रेंज व्हर्जन एकदा चार्ज केल्यानंतर 465 किलोमीटर जाऊ शकेल.

दोन्ही व्हेरियंटमधील बॅटरीला IP67 प्रोटेक्शन दिलं आहे. कारसोबत 7.2kW क्षमतेचा AC चार्जर मिळतो. पूर्ण चार्ज होण्यासाठी मिड रेंजच्या व्हर्जनला 4.30 तासांचा वेळ लागतो. तर लाँग रेंजच्या व्हर्जनला 6 तासांचा वेळ लागतो. वेगळा DC चार्जर विकत घेतल्यास हा वेळ आणखी एक तासाने कमी होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT