Tata Pay RBI eSakal
विज्ञान-तंत्र

Tata Pay : गुगल पे अन् पेटीएमची चिंता वाढली; आता 'टाटा'ही आणणार स्वतःचं पेमेंट अ‍ॅप! आरबीआयने दिली परवानगी

आरबीआयच्या परवानगीमुळे आता टाटा पेमेंट्स ऑनलाईन व्यवहार आणि फंड्स हँडल करु शकणार आहे.

Sudesh

Tata Payments App : डिजिटल इंडिया मोहिमेमुळे देशातील ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अगदी भाजी घेण्यापासून ते शेअर्स खरेदी करण्यापर्यंत सगळीकडे लोक 'यूपीआय'चा वापर करत आहेत. ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी गुगल-पे, फोन-पे, पेटीएम असे अ‍ॅप्स वापरले जातात. आता यातच 'टाटा' देखील आपलं पेमेंट अ‍ॅप लाँच करणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टाटाला पेमेंट अ‍ॅग्रिगेटर (PA) लायसन्स दिलं आहे. यामुळे आता टाटा कंपनी आपलं ई-पेमेंट प्लॅटफॉर्म लाँच करू शकते. 'टाटा पेमेंट्स'ला यासाठी परवानगी दिली आहे. टाटा पेमेंट्स ही टाटाच्या डिजिटल विंगची सब्सिडरी कंपनी आहे.

आरबीआयच्या परवानगीमुळे आता टाटा पेमेंट्स ऑनलाईन व्यवहार आणि फंड्स हँडल करु शकणार आहे. यापूर्वी टाटा कंपनी ICICI बँकेसोबत टायअप करून यूपीआय पेमेंट्स करत होती. आता पेमेंट अ‍ॅपची परवानगी मिळाल्यामुळे टाटाला मोठा फायदा होणार आहे.

टाटाचा दुसरा पेमेंट बिझनेस

टाटा कंपनीचा हा दुसरा पेमेंट बिझनेस असणार आहे. सध्या टाटाकडे देशातील ग्रामीण भागात White Lable ATM चालवण्याची परवानगी आहे. 'इंडिकॅश' नावाने हे एटीएम उभारण्यात आले आहेत. (Tata's second payments business)

1 जानेवारी रोजी टाटासोबतच बंगळुरूमधील डिजिगो (DigiGo) कंपनीला देखील पेमेंट अ‍ॅग्रिगेटर लायसन्स देण्यात आलं आहे. या कंपनीला 'ग्रो' अ‍ॅपचं बॅकिंग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT