Tata Punch EV Launch In Inadia Check Price and Range
Tata Punch EV Launch In Inadia Check Price and Range 
विज्ञान-तंत्र

Tata Punch EV: प्रतीक्षा संपली! टाटा पंच EV खिशाला परवडणाऱ्या किंमतीत लाँच; सिंगल चार्जमध्ये धावते 421 किमी

रोहित कणसे

Tata Punch EV Launch In Inadia Check Price and Range : टाटा मोटर्सने एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये आपली मोस्ट अवेटेड इलेक्ट्रिक एसयूव्ही पंच इव्ही लाँच केली आहे. विशेष म्हणजे या कारची किंमत अवघी 11.99 लाख रुपये असून सिंगल चार्जमध्ये या कारची सर्टिफाइड रेंज 421Km आहे.

कंपनीने ही कार दोन बॅटरी पॅक ऑप्शनमध्ये लाँच केली आहे. यामध्ये 25kWh आणि 35kWh हे दोन ऑप्शन मिळतात. या कारची डिलीव्हरी 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

टाटा पंच EV मध्ये अनेक इलिमेंट गे नेक्सन EV मधील देण्यात आले आहेत नेक्सॉन प्रमाणेच फेसलिफ्टमुळ एलइडी लाइट बार देण्यात आला आहे. एक्सटीरियर फिचरमध्ये फ्रंट बंपरला इंटीग्रेटेड स्लिट एलइडी हेडलाइट्स, व्हर्टिकल स्ट्रेक्स मध्ये रिडिझाइन करण्यात आलेलं लोअर बंपर आणि एख सिल्व्हर फॉक्स स्किड प्लेट देण्यात आली आहे.

मागच्या बाजूला टाटा पंच EV डिजाईनमध्ये आसीई मॉडलप्रमाणे टेललाइट डिझाइन मिळते, तसेच वाय आकाराच्या ब्रेक लाइट. रुफवर स्पॉइलर आणि एक बम्पर डिझाइन देखील मिळते. साइड प्रोफाइलमध्ये अता 16 इंच डायमंड कट अलॉय व्हील आणि सर्व व्हीलसाठी डिस्क ब्रेक देण्यात आले आहे.

टाटा पंच EV मध्ये कंपनीने दोन बॅटरी पॅक ऑप्शन दिले आहेत. यामध्ये 25kWh आणि 35kWh बॅटरी पॅकसोबत दोन चार्जिंग ऑप्शन्स देखील मिळत आहेत. यामध्ये पहिला 7.2 किलोवॅट फास्ट होम चार्जर (एलआर व्हेरियंटसाठी) तर दुसरे 3.3 किलोवॅट वॉलबॉक्स चार्जर मिळतो. 25kWh बॅटरी पॅकची सर्टिफाइड रेंज 421Km तर 35kWh बॅटरी पॅक सर्टिफाइट रेंज 315Km इतकी आहे.

टाटा पंच EV ही कार न्यू डेडिकेटेड acti.ev प्यूअर इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. तसेच यामध्ये 14 लिटर फ्रँक (फ्रंट ट्रंक) देखील देण्यात आली आहे.पंच EV मध्ये ड्युअल-टोन इंटीरियर थीम, प्रीमियम फिनिशसह फ्रेश सीट अपहोल्स्ट्री, टाटा लोगो असलेले दोन स्पोक स्टीअरिंग व्हील आणि एक मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन दिली आहे.

सेफ्टीबद्दल बोलायचे झाले तार टाटा पंच EVमध्ये सहा इअरबॅग्स, एबीएस, इएससी, इएसपी, क्रूज कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमरा सारखे स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत.

या कारमध्ये इलेक्ट्रिक कारमध्ये 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये 10.25 इंचाची डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि दोन स्पोक स्टीअरिंग व्हील देखील आहेत. तसेच ही इव्ही 10 ते 80 टक्क्यांपर्यंत 56 मिनीटांत कोणत्याही 50Kw च्या डीसी फास्ट चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. यामध्ये वॉटरप्रूफ बॅटरी देण्यात आली आहे, ज्याला आठ वर्षांची किंवा 1,60,000 Km ची वॉरंटी दिली जात आहे. यासाठी पाच ड्युअल-टोन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत, तसेच लाँग रेंजमध्ये तीन ट्रिम देण्यात आलेत, अॅडव्हेंचर, एम्पावर्ड आणि एम्पावर्ड प्लस यामझ्ये ड्युअल टोन कलर ऑप्शन मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT